एक आई म्हणुन , प्रेयसी म्हणुन किंवा इतर कोणत्याही रुपात स्त्री ही फक्त आपलं प्रेमच देत असते. अशी अनेक रूप ही स्त्री करतं असताना तिच्यातील तो भाव सहज दिसुन येतो. कदाचित प्रेम या संकल्पनेचा दुसरा शब्दच स्त्री असेन. आईच प्रेम, बायकोच प्रेम, बहिणीच प्रेम अशा कित्येक रुपात ती रहात असते. प्रेमाची ही मुर्ती खरंच खुप छान असते.

  कधी ही हसते. कधी ही रडते ही. मनातलं कधी सांगते तर कधी लपवते ही. स्त्री ही सहनशक्तीच प्रतिक ही आहे आणि रागाच ही. प्रेम ही असतं राग ही असतो. स्पष्ट ती कधी सांगते तर कधी ओळखुन घ्यावं लागतं. तर कधी स्वतःहुन बोलावं लागतं. अशा कित्येक मनाच्या , स्वभावाच्या छटा पहायला मिळतात.

  समाज, रुढी, परंपरा यांच्या जाचातून आजपर्यंत फक्त स्त्रीच भरडली गेली. ऐवढं असुनही आजही ती पुरुषांच्या बरोबरीने चालते. आजही स्त्री कोणत्याच बाबतीत पुरुषांनपेक्षा कमी नाही. जसं एक पुरुष कुटुंबाची गरज भागवु शकतो तशी आज एक स्त्री ही भागवु शकते. आणि सुशिक्षित समाजाचा आरसाच तो असतो एक सक्षम स्त्री.

 स्त्री ही फक्त सुखवस्तू किंवा घरातल काम करणारी एवढाच विचार करणार्‍या समाजात कधीच प्रगती होऊ शकतं नाही हेही तितकेच खरे. अशा समाजात स्त्री बद्दल एक वेगळीच वागणूक असते. आणि आजही आपल्या समाजात अशा विचारांचे लोक रहातात हे दुर्दैव.

  पण जेव्हा स्त्री सक्षम झाली शिकली तेव्हा नक्कीच समाज प्रगती करु लागला. आज कोणत्याच बाबतीत स्री कुठेच कमी नाही वकील, डॉक्टर, इंजीनियर अशा सगळ्याच विभागात ती आज प्रथम स्थानावर आहे. आणि आम्हाला अशा महिलांचा सार्थ अभिमान आहे.
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! !!

-योगेश खजानदार

READ MORE

जागतिक मराठी भाषा दिवस || 27 February ||

जागतिक मराठी भाषा दिवस || 27 February ||

जागतिक मराठी भाषा दिवस हा दरवर्षी दिनांक २७ फेब्रुवारी रोजी विष्णु वामन शिरवाडकर ऊर्फ कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी साजरा केला…
ब्रह्मकमळ  || BRAHMKAMAL || VIDEO ||

ब्रह्मकमळ || BRAHMKAMAL || VIDEO ||

ब्रह्मकमळ या फुलाची गोष्टच काही वेगळी आहे. जशी जशी रात्र पुढे पुढे सरकत जाते , तसे तसे ते फूल उमलत…

मराठी रंगभूमी दिन || 5 NOVEMBER ||

  ५ नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दीन म्हणून ओळखला जातो. १८४३ साली पहिले नाटक मराठी रंगभूमीने सादर केले आणि…
Scroll Up

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

कथा कविता आणि बरंच काही!! will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.