"कधी आयुष्य जगताना
 थोड वेगळ जगुन पहावं
 येणार्‍या लाटांच्या
 थोड विरुध्द जाऊ द्यावं!!

 श्वासांचा हिशोब तर होईलच
 पण प्रत्येक श्वासात
 खुप जगुन पहावं
 कधी रडताना तर कधी हसताना
 मन मोकळं करुन जावं!!

 चांदणे मोजण्याचा उगाच
 हट्ट करुन बघावं
 पाऊसात कधी तरी
 चिंब भिजून जावं!!!

 वाळूवरती बसुन एकदा
 तो सुर्यास्त पहावं
 समुद्राकडे पाहून उगाच
 आठवणींच गलबत दिसावं
 जगणं हे असच असत
 थोड जाणुन घ्यावं
 आणि मन उगाच म्हणते
 आयुष्य जगताना
 थोडं वेगळं जगुन पहावं!!"
 योगेश खजानदार 
SHARE