"कोणती ही मनास चिंता कोणती ही आठवण आहे!! बदलून गेल्या चेहऱ्यास आता कोणती नवी ओळख आहे!! कोणता हा रंग त्याचा कोणती नवी वाट आहे!! पाहू तरी कुठे आता सारे काही नवे आहे!! राहिले न आता आपुले काही त्याची व्यर्थ ओढ आहे!! गेल्या क्षणात उगा शोधता सारे हरवून गेले आहे!! पुन्हा पुन्हा परतून येता ती आठवणही एकटी आहे!! तिच्यासवे ओलावल्या तेव्हा अश्रूंची तेवढी साथ आहे!! बदलून गेला रंग सारा कोणता हा दोष आहे!! बदलला चेहराच जेव्हा कोणता हा शोध आहे!! थांब जरा ओळख स्वतःस भरकटली एक जुनी साथ आहे!! जिथे थांबली ती तुला सोडण्या अखेरची ती तुझी ओळख आहे!! कोणती ही मनास चिंता कोणती ही आठवण आहे ..!!!" ✍️© योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*