मी उगाच वाट पाहत बसलो, जिथे कोणी येणारच नाही !! मी उगाच अश्रू ढाळत बसलो, जिथे त्यास किंमतच नाही !! नकळत मग मी हरवून गेलो , जिथे कोणी शोधणारच नाही !! नकळत मग मी स्वतःस भेटलो, जिथे कोणास ओळखतच नाही !! का ? कधी? कसे ?नी कुठे? , प्रश्नाचं उत्तर भेटतच नाही !! काल, आज ,उद्या नी परवा, सोबत माझ्या कोणीच नाही !! क्षण जपावे म्हणालो मी जरी, हाती माझ्या काहीच नाही !! विचारले मी मनास माझ्या नी, एकांता शिवाय काहीच नाही !! मग कसली उठाठेव उगाच आता, माझेच मला कळत नाही !! शब्दांच्या या दुनियेत मग का ?? माझेच मला लिहीत नाही !! कोण इथे ? कोण का तिथे?? मनात तर कोणीच नाही !! सांग रे वेड्या मना मला, ते चित्र कसे विसरत नाही !! ते चित्र कसे विसरत नाही !! ✍️© योगेश खजानदार
