चाहूल कोणती ती आज मनास माझ्या आठवणीतल्या त्या घरास!! ठोठावले ते दार क्षणांचे जेव्हा कोण आले हे दारात!! ओळखीचा वाटे का आवाज साद मझ का बोलावण्यास!! मी पाहिले पुन्हा वळून जेव्हा कोणीच नव्हते का दारात!! हा भास होई का मनास आठवणींच्या सावल्यास!! जणु अंधारल्या त्या रात्रीत का हरवुन जातात त्या स्वतःत!! ही कोणती चाहूल लागली मनात कोणीच नाही तिथे दारात!! तरी धावती ही नजर कुठे शोधते हरवलेल्या चेहऱ्यास!! कोणती चाहूल ती मनात साद घालते त्या आठवणीस!! आरश्यात बघून मलाच मी शोधले ना कधी स्वतःस!! ठोठावले ते दार क्षणांचे जेव्हा स्वतःच सापडलो मी स्वतःस…!!! -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*