चार पानांचं आयुष्य || Marathi Katha kavita || POEM

Share This
"चार पानांचं आयुष्य हे, मनसोक्त जगायचं !!
 प्रत्येक श्वास घेताना , नव काही लिहायचं !!
 कुठे बेफाम हसायचं , कूठे मनमोकळ रडायचं !!
 प्रत्येकवेळी जगताना, हळूच जपून ठेवायचं !!

 पहिल्या पानावरती , नवं रूप पहायचं !!
 बालपण हे सुंदर, त्याला मनभर बोलायचं !!
 खेळायच , पडायचं , खूप काही शिकायचं !!
 सुरुवातीच्या या पानात, जग सार लिहायचं !!

 नकळत केव्हा मग, दुसरं पान वाचायचं !!
 तारुण्याच्या आरशात, स्वतःला तासनतास पाहायचं !!
 पहिलं प्रेम, पहिली कमाई, सारं जग मुठीत घ्यायच !!
 कुठे यश , कूठे अपयश , सतत धडपडत राहायचं !!

 येता येता मग ते, पान तिसरं बघायचं !!
 स्वप्न सत्यात उतरवताना, घर ते बांधायचं !!
 आई बाबा, बायको मुल, साऱ्यांना कवेत घ्यायचं !!
 आपलं सुख बाजूला ठेवून, साऱ्यांना सुखी करायचं !!

 मग येत चौथ पान, जिथे आयुष्य पुन्हा जगायचं !!
 उतरत्या वयात स्वतःला, पुन्हा तरूण करायचं !!
 नातवाच्या हाताला धरून, साऱ्या घरभर फिरायचं !!
 पिकलेल्या केसांकडे पाहत मग , आठवात हरवून जायचं !!!

 चार पानांचं आयुष्य हे!! मनसोक्त जगायचं !!
 प्रत्येक श्वास घेताना, नवं काही लिहायचं !!"

 ✍️ योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

तुझे रुसणे || LOVE POEM ||

न कळावे मनाला काही तुझे हे भाव सखे तु रुसताना ओठांवरती हळुवार ते एक हास्य दिसे कसे समजावे डोळ्या…
Read More

आठवणी…! || AATHVANI || MARATHI POEM||

हळुवार त्या पावसाच्या सरी कुठेतरी आजही तशाच आहेत तो ओलावा आणि त्या आठवणी आजही मनात कुठेतरी आहेत चिं…
Read More

अबोल मी || ABOL MI || MARATHI KAVITA ||

कधी कधी वाटतं अबोल होऊन रहावं तुझ्याकडे पहात नुसत तुझ बोलन ऐकावं पापण्यांची उघडझाप न करता एकटक …
Read More

वचन || PROMISE || LOVE POEM ||

ऐक ना एकदा मन हे बोलती हरवली सांज ही सुर का छेडली नभात ही चांदणी पुन्हा का पाहुणी चंद्रास ओढ का त…
Read More

Next Post

दिनविशेष १८ जानेवारी || Dinvishesh 18 January

Mon Jan 18 , 2021
Share This जन्म १. आदेश बांदेकर, मराठी चित्रपट अभिनेते, राजकीय नेते (१९६६)२. विनोद कांबळी, भारतीय क्रिकेटपटू (१९७२)३. आचार्य देवरत, राज्यपाल गुजरात राज्य (१९५९)४. बळवंत आपटे, राजकीय नेते (१९३९)५. महादेव गोविंद रानडे, न्यायाधीश, समाजसुधारक (१८४२)६. ऑलिव्हर हार्डी, विनोदी अभिनेते (१८९२)७. रे डॉल्बी, डॉल्बी डिजिटल सिस्टीमचे जनक (१९३३)८. देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा, कन्नड […]