"चार पानांचं आयुष्य हे, मनसोक्त जगायचं !! प्रत्येक श्वास घेताना , नव काही लिहायचं !! कुठे बेफाम हसायचं , कूठे मनमोकळ रडायचं !! प्रत्येकवेळी जगताना, हळूच जपून ठेवायचं !! पहिल्या पानावरती , नवं रूप पहायचं !! बालपण हे सुंदर, त्याला मनभर बोलायचं !! खेळायच , पडायचं , खूप काही शिकायचं !! सुरुवातीच्या या पानात, जग सार लिहायचं !! नकळत केव्हा मग, दुसरं पान वाचायचं !! तारुण्याच्या आरशात, स्वतःला तासनतास पाहायचं !! पहिलं प्रेम, पहिली कमाई, सारं जग मुठीत घ्यायच !! कुठे यश , कूठे अपयश , सतत धडपडत राहायचं !! येता येता मग ते, पान तिसरं बघायचं !! स्वप्न सत्यात उतरवताना, घर ते बांधायचं !! आई बाबा, बायको मुल, साऱ्यांना कवेत घ्यायचं !! आपलं सुख बाजूला ठेवून, साऱ्यांना सुखी करायचं !! मग येत चौथ पान, जिथे आयुष्य पुन्हा जगायचं !! उतरत्या वयात स्वतःला, पुन्हा तरूण करायचं !! नातवाच्या हाताला धरून, साऱ्या घरभर फिरायचं !! पिकलेल्या केसांकडे पाहत मग , आठवात हरवून जायचं !!! चार पानांचं आयुष्य हे!! मनसोक्त जगायचं !! प्रत्येक श्वास घेताना, नवं काही लिहायचं !!" ✍️ योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
