"चांदण्यात फिरताना
  दुख मनात सलते!!
  शुभ्र या चंद्रावरती
  डाग लागले कसले!!
  कुणी केला आघात
  कोणते दुर्दैव असते!!
  जीवन हे जगताना
  घात लागले कसले!!
  सुख शुभ्र धवल
  दुखाचे काजळ असते!!
  डोळ्यात घालुन त्यास
  सौदर्य खुलत असते!!
  आयुष्य हे असच
  जगायचे असते!!
  चंद्राचे डाग विसरुन
  शुभ्र चमकायचे असते!!
  दुखाची सल विसरुन
  आनंदी जगायचे असते!!"
 ✍️ योगेश

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

मनातील कविता || MANATIL KAVITA ||

फुलांच्या पाकळ्या मधील सुगंध तुच आहेस ना ही झुळुक वार्‍याची जणु जाणीव तुझीच आहे ना  तु स्पर्श ह्या…
Read More

मनातील..! || MARATHI LOVE POEM ||

“तो ओठाचा स्पर्श अजुनही जाणवतो मला माथ्यावर तुझ्या भावना अबोल होऊन बोलल्या त्या मनावर माझीच तु आ…
Read More
Scroll Up