चहा .. || CHAHA MARATHI POEM ||

"अमृत म्हणा , विष म्हणा
 काही फरक पडत नाही!!
 वेळेवरती चहा हवा
 बाकी काही म्हणणं नाही!!

 सकाळ सकाळ उठल्या उठल्या
 याच्या शिवाय पर्याय नाही!!
 पेपर वाचत दोन घोट घेता
 स्वर्ग दुसरीकडे कुठे नाही!!

 दूध थोड कमी चालेल
 पण साखरे शिवाय पर्याय नाही!!
 हो पत्ती थोडी जास्त टाका
 त्याच्या शिवाय मजा नाही!!

 कित्येक चर्चा रंगल्या असता
 त्यास सोबत दुसरी नाही!!
 एक कप चहा घेतला आणि
 गप्पा तिथे संपत नाही!!

 वाईट म्हणतील काही यास
 आपण मात्र लक्ष द्यायचं नाही!!
 वेळेला आपल्या एक कप तरी
 चहा घेणं सोडायचं नाही!!

 आळस झटकून टाकायला
 याच्या सारखा उपाय नाही!!
 कित्येक आजार याने मग
 पळून गेल्या शिवाय राहत नाही!!

 टपरी वर घेतला असता
 गोडी काही कमी होत नाही!!
 सिगरेटच्या दोन कश सोबत
 त्याची मैत्री काही तुटत नाही!!

 अशा या चहाचे गोडवे
 लिहिल्या वाचून राहतं नाही!!
 पण एक कप हातात येताच
 दुसरं काही सुचत नाही !!

 तेव्हा , अमृत म्हणा ,विष म्हणा
 काही फरक पडत नाही …!!"
 ✍️©योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*