"एक होत छान घर,
 चार भिंती चार माणस !!
 अंगणातल्या ओट्यावर,
 प्रेम आणि आपली माणसं!!
 दुरवर पाहीला स्वार्थ,
 हसत आला घरात!!
 प्रत्येकाच्या मनात
 अंगणातल्या ओट्यावर!!
 दिसत नाहीत आता,
 प्रेम आणि आपली माणसं!!
 घर आता बोलु लागले!!
 आपली माणसे शोधु लागले!
 नात्यांना ही सांगु लागले!!
 घर आता घर न राहिले!!
 उरल्या फक्त चार भिंती…!!"

 ✍️© योगेश

*ALL RIGHTS RESERVED*
Share This:
आणखी वाचा:  तु हवी आहेस मला ||| LOVE POEM MARATHI ||