ज्या हातांनी त्या पाखरांना बळ दिलं!! ती पाखरेच जर उतार वयात त्या आईला विसरले तर ..!! ती क्षणक्षण त्यांची वाट पाहत असेल तर ..!! तिची ती अवस्था काय असेल ..!! ते मोडकळीला आलेलं घरटं ..!! तो एकांत ..!! आणि त्या वाऱ्याशी उगाच आपल्या पिलांना शोध म्हणून केलेला वाद!! हेच सांगणारी कविता …! घरटे ….
"वाऱ्यासवे उगाच वाद आठवण ती कोणाची सांग तू माय एकदा वाट कोणती त्या पाखरांची!! उजाड वाटे घरटे तुझे मग सलगी कर तू स्वतःशी गडबड आणि गोंधळ कसला विचार तुझ्या मनाशी!! हरवलेल्या शोधता येई पण शोधावे कसे त्या देशी आपुले न दिसती त्यात मग कसली ओढ त्यांच्याशी!! भरल्या डोळ्यांनी पाहत बसते मग बघ एकदा स्वतःशी फाटक्या या घरट्यात तुझ्या बोलते तू कोणाशी!! हातात तुझ्या बळ होते तेव्हा गरज होती त्यास तुझी पंखास बळ येता त्यांच्या आठवण तुझी राहील कशी!! नकोस करू उगाच दुःख पुन्हा जग त्या आठवांशी आठव तो बेफाम पाऊस आणि ती रात्र तुझ्या पाखरांची!! काडी काडी जमवून बांधले घरटे हे आपुल्यासी आहे दुःख कळते मना पण बोलू नको परक्यांशी!! चुकल्या वाटा येतील पुन्हा ओढ राहते घरट्याची थरथरत्या हातांस तुझ्या नको साथ देऊ आसवांची!! वाऱ्यासवे उगाच वाद आठवण ती कोणाची सांग तू माय एकदा वाट कोणती त्या पाखरांची ..!! ✍️©योगेश खजानदार