गोडवा || GODVA MARATHI KAVITA ||

Share This:
"तुझ नी माझं नातं हे
 अगदी गोड असावं!!
 तुझ्याकडे पहातचं मी
 मला पूर्णत्व मिळावं!!

 कधी हसुन रहावं
 तर कधी मनमोकळ बोलावं!!
 अश्रुना ही इथे येण्यास
 आनंदाच कारण असावं!!

 कधी वाट पहाताना माझी
 तु स्वतःस ही विसरुन जावं!!
 तुझ्या प्रेमाच्या गोडव्यात
 सार काही मधुर व्हावं!!

 तुझ्या खोट्या रागास ही
 मी उगाच का पहावं!!
 तुला मनवण्यास तेव्हा मी
 तुला काय बरे द्यावं??

 तुही तेव्हा माझ्याकडुन
 हक्काने आवडीचं मागावं!!
 वाटते त्या गोडव्याने ही आता
 मनामध्ये कायम रेंगाळावं..!!"
 योगेश खजानदार 

*ALL RIGHTS RESERVED*