मार्ग क्रमता व्हावे बोध!! चुकता तिथे द्यावे बोल !!
चरण एक ते वंदावे मन !! गुरूकृपेचे नसावे मोल !!

सहज सुंदर सावली ती एक !! सांगावें शिष्यास विचार अनेक !!
ज्ञानाची जणू विहीर ती खूप !! मस्तक ठेवून मी एकरूप !!

जमिनीवर चाले जणू तो सूर्य!! प्रकाशता सर्वत्र अंधार तो दूर !!
सांगे जणू निसर्गाचे ऋण !! शिकवता जसे जगण्याचे गुण !!

किती घ्यावे? तरी उरावे!! ज्ञान ते अद्भुत !!भरून वाहे जणू ते अमृत !!
सांगता सांगता !! सांगावे एक !! एक जणू अर्थ अनेक !!

गुरू असावे असे प्रेरणा स्त्रोत !! घडावे शिष्य जसे भाग्यवंत !!
ज्ञानी, पराक्रमी आणि विचारवंत !! समाज घडे असे मूर्तिमंत !!

एकरूप सांगावे पण विविध ती रूप !! गुरुरुप जाणे तो बुद्धिवंत !!
ज्ञान ते सोबती असे जणू अनंत !! वाट ती अवघड, नसेल कोणती खंत !!

गुरू नसता भटके ती जणू वाट !! गुरू नसता ज्ञान ही जणू अज्ञान !!
गुरुभेट व्हावी जणू एक आठवण ?? गुरुचरण स्पर्श अमूल्य एक क्षण !!

✍️© योगेश खजानदार

© ALL RIGHTS RESERVED ©
paper boats on solid surface
SHARE