"गीत ते गुणगुणावे त्यात तु मझ का दिसे शब्द हे असे तयाचे मनात माझ्या बोलते असे!! तु राहावी जवळ तेव्हा सुर जे छेडले असे हुरहुर ही कोणती मनाची ठाव मझ माझा नसे!! फितुर झाले शब्द जेव्हा गीत ते माझे असे भाव हे माझ्या मनीचे सांगतो तुला असे!! ऐक ना तु एकदा गीत हे माझे असे तुझ्यातील तु मला भेटशील का रे असे!! हरवुन गेली वेळ जेव्हा भास हा होतो असे न कळावे नजरेस तेव्हा का तुला शोधसी असे!! हे गीत गावे पुन्हा पुन्हा मन हे का ऐकते असे शब्द हे असे तयाचे त्यात तु मझ का दिसे!!" - योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*