गीत || GEET MARATHI KAVITA ||

Share This:
"सांग ना एकदा तु मला
 सुर हे तुझे मनातले!!
 ऐकना एकदा तु जरा
 शब्द हे माझे असे!!

 कधी पाहुनी तुज मी
 हरवले हे शब्द असे!!
 बघ ना एकदा तु जरा
 सुर हे विरले कसे!!

 कधी फुलांसवे दिसली पाखरे
 तुझेच गोडवे गाते असे!!
 कधी तुझ्याचसाठी मन हे वेडे
 तुझ्याच भोवती फिरते जसे!!

 तु हसली तर वेलीवरची
 फुले ही का हसते असे!!
 तु लाजलीस तर वेडावुन ती
 तुझ्याच प्रेमात पडते कसे!!

 शोधुन थकलो सुरांस आज त्या
 तुझ्याचसाठी वेडे असे!!
 कधी वेलीवरती कधी फुलांवरती
 शब्दही मज भेटते जसे!!

 विसरले शब्दही, विरले ते सुरही
 प्रेमाचे हे गाणे कसे!!
 तुझेच सुर ते, माझेच शब्द ते
 हरवले तरी का गीत असे!!"
 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*