Skip to content

मराठी कथाकविता.com
  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • चित्रबद्ध
  • कॅटेगरीज
  • अध्यात्मिक
  • माहिती
  • संपर्क
  • Call +919923777633 Email Khajandar_yogesh@yahoo.in

मुखपृष्ठ » अध्यात्मिक

गजानन महाराज आरती || अष्टक || बावन्नी || नमस्काराष्टक ||

गजानन महाराज आरती || अष्टक || बावन्नी || नमस्काराष्टक ||

श्रीगजाननस्तोत्र

श्रीगणेशाय नमः ||

हे सर्वाद्या सर्वशक्ती | हे जगदोद्वारा जगत्पति |
साहय व्हावें सत्वरगति | या लेकराकारणें ||१||

जे जे काही ब्रम्हांडात | तें तें तुझें रुप सत्य |
तुक्यापुढें नाहीं खचित | कोणाचीही प्रतिष्ठा ||२||

तूं निरंजन निराकार | तूंच अवधूत दिगंबर |
साकाररुप सर्वेश्र्वर | विश्र्वनाथ तूंच की ||३||

जे जे काही म्हणावें | तें तें तुझे रुप बरवें |
दासगणूस आतां पावे | हीच आहे याचना ||४||

तूंच काशी विश्र्वेश्वर | सोमनाथ बद्रीकेदार |
महंकाल तेवि ओंकार | तूंच की रे त्र्यंबकेश्र्वरा ||५||

भीमाशंकरा मल्लिकार्जुन | नागनाथ पार्वतीरमण |
श्रीघृणेश्वर म्हणून | वेरुळगांवी तूंच की ||६||

तूंच परळी वैजनाथ | निधीतटाला तूंच स्थित |
रामेश्वर पार्वतीकांत | सर्व संकट निवारता ||७||

हे कृपार्णवा नारायणा| महाविष्णो आनंदधना |
हे शेषशायी परिपूर्णा | नरहरि वामना रघुपते ||८||

तूं वृंदावनीं श्रीहरी | तूं पांडुरंग पंढरपुरीं |
व्यंकटेश तूं गिरीवरीं | पुरीमाजीं जगन्नाथे ||९||

द्वारेसी नंदनंदन | नाम देती तुजकारण |
जैसे भक्तांचें इच्छील मन | तैसे तुज ठरविती ||१०||

आता हे चंद्रभागातटविहारा | या गजाननस्तोत्रा साहय करा |
हेंच मागें पसरुनि पदा | तुज विठठले दासगणू ||११||

गजानन जे स्वरुप कांही | तें तुक्याविण वेगळे नाही |
दत्त भैरव मार्तड तेही | रुपें तुझीच अधोक्षजा ||१२||

या सर्व स्वरुपांकारण | आदरे मी करी वंदन |
माझे त्रिताप करा हरण | हेंच आहे मागणे ||१३||

हें महालक्ष्मी कुलदेवते | कृपाकटाक्षें लेकरातें |
पाही दासगणूतें | हीच तुजला प्रार्थना ||१४||

आतां श्रीशंकराचार्य गुरुवर | तेवी नाथ मच्छिंदर |
निवृत्तीदास ज्ञानेश्वर | समर्थ सज्जनगडीचे ||१५||

हे तुकारामा महासंता | तुजलागी दंडवता |
करितों होई मला त्राता | नाहीं ऐसे म्हणूं नका ||१६||

हे शिडी।कर बाबासाई | लेकरांसाठी धांव घेई |
वामनशास्त्री माझे आई | माझी उपेक्षा करुं नका ||१७||

हे शेगांवीच्या गजानना | महासंत्ता आनंदघना |
तुला येऊं दे काहीं करुणा | या अजाण दासगणुची ||१८||

तुम्हां सर्वा प्रार्थून | स्तोत्र करितो हे लेखन |
माक्या चित्तीं म्हणून | वास आपण करावा ||१९||

जे जे तुम्ही वदवाल कांही | तेंच लिहीन कागदीं पाहीं |
स्वतंत्रता मलजा नाही | मी पोषणा तुमचना असें ||२०||

माघमांसीं सप्तमीस | वद्यपक्षीं शेगांवात |
तुम्ही प्रगटला पुण्यपुरुष | पंथाचिया माझारी ||२१||

उष्टया पत्रावळी शोधन | तुम्ही केल्या म्हणून |
मिळालें की नामभिमान | पिसा पिसा ऐसें तुम्हा ||२२||

उगी न वाढावी महती | म्हणून ऐसी केली कृती |
तुम्ही साच गुरुमूर्ती | लपून बसाया कारणे ||२३||

परि विचारवंत जे ज्ञानी | तें तुम्हालागी पाहुनी |
भ्रमा हातफळी देऊनी | पाय तुमचे वंदितात ||२४||

बंकटलाल दामोदर | हे दोघे चतुर नर |
भ्रमातें सारुन दूर | शरण आले तुम्हांला ||२५||

बंकटलालाचें सदनास | तुम्ही राहिला कांही दिवस |
तेथे जानराव देशमुखास | मरत असतां वांचविले ||२६||

केवळ पाजुनियां तिर्था | आपुल्या पदींचे समर्था |
तुजलागी दंडवता | असो आमुचा बरचेवर ||२७||

तुझीया लिलानिधीचा | नच लागे पार साचा |
टिटवींने सागाराचा अंत कसा घेववेल ? ||२८||

पितांबरा देऊनी भोपळा | नाल्यास तुम्ही पाठविला |
जल तें हो आणविण्यांला | तहान लागली म्हणून ||२९||

पितांबरासी बजाविलें | ओंजळीनें पाणी भले |
न पाहिजेतुंवा भरले | या माझिया भोपळयांत ||३०||

जलांत तुंबा बुडवावा | जलें पूर्ण भरुन घ्यावा |
आणि तोच मला आणून द्यावा | यांत अंतर करुं नको ||३१||

तुंबा बुडेल ऐंसे पाणी | नव्हते नाल्यालागुनी |
विश्र्वास ठेवलोनिया वचनीं | ऐसे केलें पितांबरे ||३२||

नाल्याचिया जलास | तुंबा तो लावितां सरसी |
आपोआप त्या ठायासी | भव्य खांच पडली की ||३३||

तुंबा त्यांत भरत आला | ऐशी तुझी अगाध लिला |
ती साच वर्णण्याला | शेषही थकेल वाटते ||३४||

सोमवारी प्रदोषांसी | बंकटलालच्या सदनरासी |
भाविकां आपण व्योमकेशी | दिसतसां महाराजा ||३५||

यात नवल ना तिळभर | कां की तूंच शंकर रमावर |
हे जेवढे चराचर | तेवढे तुम्हींच आहात की ||३६||

तुझे स्वरुप यथातथ्य | मानवासी नाहीं कळत |
म्हणून पडती भ्रमांत | मायावधहोऊनी ||३७||

प्रातः कालाचे वेळीं | संपली होती दिवासही |
जानकीराम देईना मुळीं | विस्तव तुमच्या चिलमिस ||३८||

जानकीराम सोनार बागेसरीचा वैश्र्वानर |
द्यावयासी कुरकुर | करुं लागला असे की ||३९||

तें अंतज्ञानी जाणून | कौतुक दाविले करुन |
चिलीम विस्तवांवाचून | पेटूनिया दाविली ||४०||

सोनार विस्तव देण्यांला | नाहीं ऐसे वदला|
म्हणूनिया येता झाला | राग भगवंताकारणें ||४१||

चिंचवणे ते सोनाराचें | नासलें अक्षय तृतीयेचें |
प्राणघातक किंडयांचे | झालें त्यांत साम्राज्य ||४२||

अवघे टकमका पाहती | नाका पदर लाविती |
एकमेकां सांगती | हें चिंचवणे खाऊ नका ||४३||

मग जानकीराम म्हणाला | साधूस वितव ना दिला |
त्याचा हा प्रत्यय आला | धन्य धन्य हा गजानन ||४४||

मग तात्काळ उठून वेगेंसी | आला बंकटलाल सदनासी |
हकीकत बंकटलालासी | सर्व केली निवेदन ||४५||

बंकटलालाचे वशिल्यानें | चरण धरिलें सोनारानें |
अनन्यभाव भक्तींने | गजाननाचे तेधवां ||४६||

गुरुराया अंतर | मऊ आपले साचार |
तेंच का हो केले कठारे | मजविषयी समर्था ||४७||

आतां या चिचवण्यासी | हात लावा पुण्यराशी |
त्याविण मी सदनासी | न जाय येथून ||४८||

ऐसी त्याच एकुण गिरा | चिंचवण्यासी लाविले करा |
चिंचवणी तेच झारा झरा | अमृताचा विबुधहो ||४९||

यापरी जानकीराम शरण आला | अखेर आपुल्या पदाला |
मुकीनचंदु कृतार्थ केला | खाऊन दोन कानवले ||५०||

माधव नामें चिंचोलीचा | ब्राम्हाण एक होता साचा |
त्यास बोध अध्यात्माचा | तुम्हीच एक केलात ||५१||

भ्रांती त्याची उठविली | प्रपंच माया तोडिली |
मोक्ष पर्वणी लाधली | तया माधवाकारणें ||५२||

ऐसें आपुलें महिमान | श्रेष्ठ आहे सर्वाहून |
पदरी असल्या विपुल पुण्य | पाय तुझे सांपडती ||५३||

वसंत पूजेकारण | घनपाठी ब्राम्हाण |
आणविलेत आपण | ऐन वेळीं तेधवा ||५४||

बंकटलालें आपणासी | नेले खावया मक्यासी |
आपुलिया मळयासी | आत आग्रह करुनी ||५५||

मोहळें होती मळयांत | मधमाशांची भव्य सत्य |
तीं पेटविता आगटीप्रत | उठती झालीं निजलीलें ||५६||

मधमाशांसी पाहून | लोक करिती पलायन |
भय जिवाचें दारुण | आहे की प्रत्येकाला ||५७||

तुम्ही मात्र निर्धास्त बैसता झाला मळयांत |
मधमाशा अतोनांत | बसल्या तुमच्या अंगावरी ||५८||

लोक दुरुन पाहती | परी न कोणाची होय छाती |
तुम्हां सोडवाया गुरुमूर्ती | मधमाशांच्या त्रासांतून ||५९||

बंकटलाल दु;खी झाला | पाहून त्या माशाला |
त्यांनी मात्र थोड केला | प्रयत्न तुम्हां सोडविण्यांचा ||६०||

कांही वेळ गेल्यावरी | तुम्हीच आज्ञ केली खरी |
मधमाशांस जाया दुरी | तें अवघ्यांनी पाहिलें ||६१||

आपुल्या आज्ञेनुसार | मधमाशांस झाल्या दुर |
बंकट म्हणे सोनार| आणवितों कांटे काढावया ||६२||

कां की मधमाशांचे काटे | रुतले असतील मोठें |
ते लपून बसती बेटे | स्वामी अवघ्या शरीरांत ||६३||

म्हणून ते काढावया | सोना आणवितो ये ठायां |
आपण म्हणालात वाया | हा त्रास घेऊं नका ||६४||

योगशास्त्र येतें मला | मी योगबलें कांटयाला |
बाहेर काढितो त्याजला | सोना कशास पाहिजे ? ||६५||

ऐसें बदून कुंभक केला | तेधवा की आपण भला |
तेणें बाहेर काटयाला | पडणें अवश्यक झाले की ||६६||

हे कौतुक सवा्रनी | पाहिले त्या ठिकाणी |
जो तो मनुष्य जोडी पाणी | स्वामी आपणांकारणे ||६७||

आपण म्हणाला त्यावर | हे जीवांनो, घटकाभर |
बैसा या वृक्षावर | आतां कोणास चावूं नका ||६८||

संकल्प बंकटलालचा | पूर्ण करणें आहे साचा |
सोहळा मका सेवण्यांचा | निर्विघ्न त्याचा होऊं द्या ||६९||

पहा माशा उठतां क्षणी | तुम्ही गेलांत पळूनी |
संकट येतां नाही कोणही | तारिता हे ध्यांनी धरा ||७०||

लाडू, पेढे खावयास | लोक जमती विशेष |
परी साहय संकटास | कोणीही करीना ||७१||

हे तत्व ध्यानी धरा | ईश्र्वरासी आपुला करा |
म्हणजे सफल होय खरा | तुमचा की संसार ||७२||

ऐसा उपदेश भक्ताप्रती | साच केलात गुरुमूर्ति |
एक्या मुखें करुं किंती | मी आपुलें वर्णन ||७३||

कृष्णाजीचें मळयांत | दांभिक गोसावी आले बहुत |
जे होते सांग्रत | शुष्क वेदांत जगाला ||७४||

त्या गोसाव्यांचा ब्रहागिरी | महंत आणिला वाटेकरी |
जो जळत्या पलंगावंरी | तुम्हांजवळ ना बैसला ||७५||

चहूंकडून होता पेटला | तो अग्नी आपण शांत केला |
तेणें त्या ब्रम्हागिरीला | कौतुक आत वाटले ||७६||

सर्व आभमान सोडून | आपणां तो आला शरण |
अग्नीचें ते अग्नीपण | चांदण्यापरी केले तुम्ही ||७७||

टाकळीकर हरीदासाचा | घोडा आज्ञेंत वागला |
तो सर्वानी पाहिला अशक्य कांही आपणाला | नाही उरलें जगात ||७९||

आडगांव आकोली गांवात | कावळे शिरता भंडा-यात |
आपण पळविले क्षणांत | आज्ञा त्यासी करुन ||८०||


अजूनपर्यत त्या ठायी | कावळा ये ना एकही |
संत जे वदतील कांही | खोटे होय कोठून ? ||८१||

प्रखर असुनी उन्हाळा | निर्जनशा काननाला |
ऐन दुपारचे समायाला | कौतुक केले आभनव ||८२||

अकोलीच्या रानांत | सर्व्हे नंबर बावन्नात |
एका शुष्क गर्दाडाप्रत | बनविली तुम्ही पुष्करिणी ||८३||

भक्त आपुला पितांबर | कृपा होती त्याचेवर |
तयाचाही आधकार | थोर आपण बनविला ||८४||

ज्यातीप्रत मिळाल्या ज्योत | भेद काही न तेथे उरत |
खराच पितांबर पुण्यवंत साक्षात्कारी जाहला ||८५||

वठलेल्या आंब्याला | त्यांनी आणविला पाला |
कोंडोली ग्रामाला | हे कृत्य झाले की ||८६||

भीमा अमरजा संगमासी | क्षेत्र गाणगापुरासी |
पर्णे फुटलीं टोणप्यासी | नरसिंह सरस्वती कृपेने ||८७||

तेंच कृत्य कोंडोलीतें | करविले पितांबरा हातें |
आपणची गुरुमर्ते | हे स्वामी समर्था ||८८||

वद्य पक्षांत माघमासी | सोमवतीच्या पर्वासी |
क्षेत्र ओंकारेश्ररासी | गेले असतां भक्त तुमचे ||८९||

तेथें महानदी नर्मदेंत | नौका फुटली अकस्मात |
पाणी येऊ लागले आंत | नाव बुडूं लागली ||९०||

त्या नौकेंत आपण होतां | म्हणून नर्मदा लाबी हातां |
फुटलेल्या ठायी तत्वतां | ऐसा प्रभाव आपुला हो ||९१||

नौका कांठास लाविली | नर्मदेने आणून भली |
आपणां बदूंन गुप्त झाली | हें बहुतांनी पाहिलें ||९२||

त्र्यंबक पुत्र कवराचा | आपुला भक्त होता साचा |
जो अभ्यास वैद्यकीचा | हैद्राबादी करीत असे ||९३||

त्याची कांदा भाकर| जैसा द्वादकाधीश भगवान |
कौरवांचे पक्वान्न सांडूनिया भक्षण | करी विदुर कण्यांचे ||९५||

तैसेंच आपण केलें | कवराचें अन्न भक्षिलें |
ख-या भक्तीचें भुकेले | आपण आहा महाराजा ||९६||

सवळदचा गंगाभारती | तया फुटली रक्तीपिती |
तो त्रासून जिवाप्रती | आला असतां आपणाकडे ||९७||

लोक अवघे तिटकारा करुं लागलें त्याचा खरा |
कोणी न देती त्यास थारा | रोगभय करुन ||९८||

त्या गंगाभारतीस | येऊं न देती दर्शनास |
कोणी आपल्या शेगांवास | ऐसी स्थिती जाहली ||९९||

लोक म्हणती तयाप्रत | मिसळू नकोस लोकांत |
त्रास न द्यावा यत्किंचित | तूं समर्थाकारणें ||१००||

तो गोसावी एकें दिवशी | आला आपुल्या दर्शनासी |
डोई ठेवतां पायांसी | मारिले आपण तयाला ||१||

थोबाड झोडिलें दोन्ही हातें | लाथ मारुन कमरेतें |
उलथून पाडिला रस्त्याते | थुंकून त्याच्या अंगावरी ||२||

बेडका पउतां अंगावर | गंगाभारती हर्षला फार |
म्हणे आतां होईल दूर | व्याधी माझी नि;संशय ||३||

जो बेडका होता पडला | तोच त्याने मलम केला |
अवघ्या अंगास लाविला | चोळचोळूनी निज हातें ||४||

ऐशा रीती सेवा करीत | राहिला गोसावी शेगांवात |
तयाच्या महारोगाप्रत | आपण की हो निवटिलें ||५||

तुमच्या कृपेचिया पुढें | औषध काय बापुडे |
अमृत तेंही फिके पडे | ऐसा महिमा अगाध ||६||

कोणतेंही संकट जरी | येऊन पडलें भक्तांवरी |
ते निजकृपेने करीतां दुरी | आपण साच दयाळा ||७||

संकटीं खंडू पाटलाप्रत | आपण देऊन कृपेचा हात |
न्यायाधिशाचे कचेरींत | निर्दोष त्यासी सोडिलें ||८||

बाळकृष्ण रामदासी | होता बाळापूर ग्रामासी |
त्या माघ वद्य नवमिसी | समर्थदर्शन घडविलें ||९||

घटकेत दिसावा गजानन | घटकेंत सूर्याजीपंत |
नंदन घटकेत भजन ते गणगण | घटकेंत जयजय रघुवरी असे ||११०||

तेणें बाळकृष्ण घोटाळला | अखेर ओळखून आपणाला |
समर्थ म्हणूनी नमस्कार केला | काय लिला वानूं ती ||११||

संत आधकारें समान मुळीं | न तै आधक न्यून |
जैसें भक्तांचे इच्छी मन | तैशी यपें दिसती तया ||१२||

गणेशदादा खपर्डे | उमरावतीचे गुहस्थबडे |
कुपादृष्टीने त्यांकडे | पाहिले आपण सर्वदा ||१३||

या खापडर्याला व-हाड प्रांती | अनभिषिक्त राजा बोलती |
राष्ट्रोद्वाराची तळमळ ती | होती खापडर्याकारणे ||१४||

कोठे न आले अपयश त्याला | हा तुमच्या कृपेचा महिमा झाला |
बाळ गंगाधर टिळकाला | तुम्हीच कृपा केलीत ||१५||

भगवंताने अर्जुनाला | भगवद्रीतेचा उपेदश केला |
ज्य गीतेने जगाला | थक्क करुन सोडीले ||१६||

पार्थ देवाचा भक्त जरी | राहिला वनवासाभीतरी |
बारा वर्षे कांतारी | ऐसें भागवत सांगते ||१७||

भवंताचा वशिला | प्रत्यक्ष असून अर्जुनाला |
वनवास तो नाही चुकला | तैसेच झालें टिळकांचे ||१८||

संतकृपा असून | शिक्षा झाली दारुण ब्रम्हादेशी नेऊन |
मंडाल्याशीं ठेवीले त्या ||१९||

श्रोते त्याच मंडाल्यांत | गितारहस्य केला ग्रंथ |
जो आबालवृद्वांप्रत | मान्य झाला सारखा ||१२०||

कोल्हळकराहातें भला | आपण होता पाठविला |
भाकरीच्या प्रसादाला मुंबईत टिकाकारणें ||२१||

फळ हे त्या प्रसादाचें | गीतारहस्य होय साचें |
भाष्यकार गीतेचे हे | सहावे झाले की ||२२||

पहिले शंकराचार्य गुरुवर | दुसरे रामानुजाचार्य |
थोर मध्व | वल्लथ त्यानंतर भाष्यकार जाहले ||२३||

पांचवी ज्ञानेश्वर माऊली | भावार्थदीपिका टिका केली |
जी मस्ती धारण केली | अवघ्या मुमुक्षु जनांनी ||२४||

ज्ञानेश्र्वरा नंतर | एक दोन टीकाकार |
झाले परी ना आली सर | त्यांना ज्ञानेश्वर माऊलीची ||२५||

वामनाची यथार्थदीपिका | तैसाच गीतार्णव देखा |
हेहीं ग्रंथ भाविका | काही अंशें पटले की ||२६||

गीतेचा अर्थ कर्मपर | लावी बाळ गंगाधर |
त्या टिळकांचा आधकार | बानाया मी समर्थ नसे ||२७||

मागील टिका समयानुसार | अवतरल्या या भूमीवर |
तैसाच आहे प्रकार | या गीतारहस्याचा ||२८||

तया लोकमान्य टिकांवरी | आपण कृपा केली खरी |
म्हणून तयाचा झाला करी | गीतारहस्य महागं्रथ ||२९||

खामगांवी डॉक्टर कवरा | तीर्थ आणि अंगारा |
आपण नेऊन दिलांत खरा | ब्राम्हाणाच्या वेषाने ||१३०||

ज्यायोगे व्याधी त्याीच | समुळ हरण झाली साची |
तुम्ही काळजी भक्तांची | अहोरात्र बहातसां ||३१||

कन्या हळदी माळयाची | बायजा नामे मुंडगांवची |
ही तुमच्या कृपे जनीची | समता पावती झालीसे ||३२||

वरदहस्त बायजाशिरीं | तुम्ही ठेवितां निर्धारी |
तीही झाली आधकारी | केवळ तुमच्या कृपेने ||३३||

मुंडगांवच्या पुंडलिकाला | होता जरी प्लेग झाला |
तो येता दर्शनाला | व्याधी दुर्धर हरिली तुम्ही ||३४||

सद्वक्ता बापुन्याप्रती | तुम्ही भेटविला रुक्मणीपती |
नाहीं अशक्य कोणती | आपणांकारणे ||३५||

एके वेळी आपणाला | गोपाळ बुटी घेऊन गेला |
भोसल्याच्या नागपूरला | अती आग्रह करुन ||३६||

गोपाळ बुटी श्रीमंत भारी | हजारों पंक्ती त्यांचे घरीं |
उठूं लागल्या बरचेवरी | केवळ आपल्या प्रीत्यर्थ ||३७||

इकडे शेगांव सुने पडले | प्रतवतू दिसूं लागले |
मुखी तेज नाही उरले | मुळींच पाटील मंडळीच्या ||३८||

शेगांवीचे पुष्कळ जन | आले नागपुरा जाऊन |
परी न झालें दर्शन | समर्थाचे कोणाला ||३९||

चौक्या पहारे सभोंवार | कडेकोट होते फार |
समर्थाच्या पायांवर | शीर ठेवणे मुष्कील झालें ||१४०||

नागपूराहून आपणाला | आणण्या हरी पाटील निघाला |
दहा पांच संगतीला | भक्त घेऊन शेगांवचे ||४१||

आला सिताबर्डीसी | गोपाळ बुटीच्या सदनासी |
तो तेथे दारापाशीं | शिपाई पाहिले दोन चार ||४२||

शिपायांनी पाटलाल | जरी होता अळकाव केला |
परी तो न त्यांनी जुमानिला बळकळ होता म्हणून ||४३||

हरी पाटील शिरला आंत | गडबड झाली तेथ बहुत |
तुम्ही धावून त्याचा हात | ण्रीिलरत की न्रमरले ||४४||

जैसे वासरासी पाहाता | गाय धावे पुण्यवंता |
तैसेच तुम्ही समर्था | केलेंत घरी त्रुटीच्या ||४५||

गोपाळ बुटी धांवत आले | हरी पाटला विनविते झाले |
पाआल मागणे ऐकले | पाहिजे तुम्ही थोडेसं ||४६||

भोजनोत्तर समर्थाला | जा घेऊन शेगांवाला |
तो आहे भक्तीस विकला | शेगांवकरांच्या नि;संशय ||४७||

सर्वाचे झाल्या भोजन | आपण निघाला तेथून |
आशीर्वाद तो देऊन | गोपाळ बुटीच्या कुटुंबाला ||४८||

त्या पाटील हरीवरी कृपा आपुली | अत्यंत खरी श्रीकल्याणस्वामीपरी|
सेवेस महानिधान | जोडले ऐसे वाटतसे ||१५०||

धार कल्याणचे रंगनाथ | आले तुम्हां भेटण्याप्रत |
गुरुराया या शेगांवात | शेगांवचे भाग्य मोठे ||५१||

श्रीवासुदेवानंद सरस्वती | जे प्रत्यक्ष दत्तमूर्ति |
ऐशा जगमान्य विभूति | आल्या आपल्या दर्शना ||५२||

जरी आपण देह ठेविला | तरी पावतसा भाविकाला |
याचा अनुभव रतनसाला| आला आहे दयानिधे ||५३||

रामचंद्र कृष्णाजी पाटील | भक्त तुमचा प्रेमळ |
त्याची तुम्ही पुरविली आळ | गोसाव्याच्या रुपाने ||५४||

तैसचे बोरीबंदरावरी | जांजळ जो कां लक्ष्मण हरी |
त्याला भेट दिली खरी | परमहंसरुपानें ||५५||

तुमच्या लिलेच्या तो पार | कोणा न लागे तिळभर |
मुंगी मेरुमांदार | आक्रमण कैशी करी ||५६||

टिटवीच्याने सागर | शोषवेल का साचार |
दासगणू हा लाचार | आहे सर्व बाजूने ||५७||

आपुली वर्णण्या लिला | महाकवीच पाहिजे झाला |
मजसारख्या घुंगुरडयाला | ते साधणे कठीण ||५८||

परी मान पावेल भूमिवरी | सहावास या कस्तुरीच्या ||१६०||

माझें भाग्य धन्य धन्य | म्हणून तुमचे पाहिले चरण |
आतां न द्यावे लोटून | परत दासगणूला ||६१||

सर्वदा सांभाळ माझा करा | दैन्यदुःखातें निवारा |
भेटवा मशी सारंगधरा | भक्त बापुन्याच्यापरी ||६२||

आपल्या कृपेकरुन | सानंद राहो सदा मन |
सर्वदा घडो हरिस्मरण | तैसीच संगत सज्जनांची ||६३||

अव्याहत वारी पंढरीची | मम करे व्हावी साची |
आवड सगुण भक्तीची | चित्ता ठायी असू द्या ||६४||

अंत घडो गोदातीरीं यावीण आशा नाही दुसरी |
स्मृती राहो जागृत खरी | भजन हरीचें करावया ||६५||

भजन करितां मोक्ष घडो | देह गोदातीरी पडो |
सद्वत्कांसी स्नेह जडो | दासगणूचा सर्वदा ||६६||

मागितले तें मला द्यावे | तैसे लोकांचेही पुरवावे |
आर्त गुरुवरा मनोभावे | जे या स्तोत्रा पठतील ||६७||

या स्तोत्राचा पाठ जेथ | भाव होईल तेथ तेथ |
तेथे न राहो कदा दुरित | इतुलेही दयाळा ||६८||

स्तोत्रपठाकां उत्तम गती | तैशी सतती संपत्ती |
धर्मवासना त्याच्या चित्तीं | ठेवा जागृत निरंतर ||६९||

भूतबाधा भाभानामती | व्हावी न स्तोत्रपठकांप्रती |
लौकिंक त्याचा भूवरती | उत्तरोत्तर वाढवावा ||१७०||

हे स्तोत्र ना अमृत | होईल अवघ्या भाविकांप्रत |
येईल त्याची प्रचीत | सद्वाव तो ठेविल्या ||७१||

मोठयानें करुन गर्जना | बहावें साधू गजानन |
शेगांवचा योगीराणा | सर्वदा पावो तुम्हाते ||७२||

सद्गुरुने चित्तास | पहा माक्या करुन वास |
बोलविले या स्तोत्रास | तुमच्या हिताकारणे ||७३||

याते असत्य मानल्या | सुखाचा तो होईल नाश |
भोगीत रहाल संकटास | वरचेवर अभक्तीने ||७४||

अभक्ती ती दूर करा | गजाननासी मुळीं न विसरा |
त्याच्या चरणी भाव धरा | म्हणजे जन्म सफल होई ||७५||

स्तोत्रपठकांची आपदा | निमेल की सर्वदा |
दृढ चित्तीं धरा पदां | गजानन साधूच्या ||७६||

वाचे म्हणता गजानन | व्याधी जातील पळून |
जैसे व्याघ्रा पाहून | कोल्हें लांडगे पळती की ||७७||

स्तोत्रपठका भूमीवरी | कोणी न राहील पहा वैरी |
अखेर मोक्ष त्याच्या करी | येईल की नि:संशय ||७८||

शके अठराशें अडुसष्टांत | श्रीक्षेत्र शेगांवात |
समाधीपुढे मंडपांत | रचियेलें स्तोत्र पहा ||७९||

फाल्गून वद्य एकादशी | मंगळवार होता त्या दिवशीं |
स्तोत्र गेले कळसासी | गजाननाच्या कृपेने ||१८०||

शांति शांति त्रिवार शांति | असो या स्तोत्राप्रती |
स्वामी गजानन गुरुमुर्ती | आठवा म्हणे दासगणू ||१८१||

|| श्रीहरिहार्पणमस्तु || शुभं भवतु ||

|| इति श्रीसंत गजानन प्रार्थना स्तोत्र समाप्त ||

SHARE

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter
  • Tumblr
  • Pinterest
Pages: 1 2 3 4 5 6
श्री गजानन महाराज अष्टक श्री गजानन महाराज नमस्काराष्टक श्री गजानन महाराज बावन्नी श्री गजानन महाराजांची आरती श्रीगजाननस्तोत्र

TOP POEMS

person standing near lake

ओझे भावनांचे || OJHE BHAVANANCHE ||

"नकळत साऱ्या भावनांचे ओझे आज का झाले काही चेहरे ओळखीचे त्यात काही अनोळखी का निघाले!! बोलल्या भावना मनाशी तेव्हा सारे गुपित उघडे का झाले क्षणभर सोबती हसवून जाता आपलेच का रडवून गेले!!
woman with weary eyes

मला माहितेय || MARATHI KAVITA ||

खुप बोलावंसं वाटतं तुला पण मला माहितेय आता तु मला, बोलणार नाहीस!! सतत डोळे शोधतात तुला पहाण्यास एकदा आता नजरेस तु पुन्हा, दिसणार नाहीस!!
white black and gray floral textile

सावली || SAWALI || MARATHI POEM ||

आठवणींची सावली प्रेम जणु मावळती दूरवर पसरावी चित्र अंधुक लांबता ही सोबती दुर का ही चालती का मझ तु सोडती विरह नकळत
woman and child walking on beach

माझी आई || MAJHI AAI || MARATHI POEM ||

अथांग भरलेल्या सागराचे कोणी मोजेल का पाणी त्या सम माझ्या आईचे प्रेम नजरेत दिसते आकाश सारे सामावून घ्यावे मिठीत वारे त्या सम् माझ्या आईचे मन

TOP STORIES

fashion man people woman

द्वंद्व || कथा भाग ५ || शेवट भाग ||

विशालच सायलीला शोधायला जाणं. पण सायलीला शोधावं कुठं हा प्रश्न. मग आईच्या मनात नक्की काय होत?? आणि सायली अखेर भेटेल का विशालला ?? की पुन्हा विशालच प्रेम अधुरच राहील. नक्की वाचा शेवट भाग.
close up photo of skull

स्मशान || शेवट भाग || Marathi Katha ||

आयुष्यभर जगण्यासाठी क्षण न क्षण जळत राहायचं !! कशासाठी ?? अखेर राख होऊन धगधगत राहण्यासाठी ?? परवा हाच सरपंच किती रुबाबात बसला होता !!! आज त्याची राख झाली!! ज्या वाड्यासाठी अट्टाहास केला तो तर मिळाला नाहीच !! भेटलं अखेर काय ?? तर ही समाधानाची छोटीशी जागा !! अखेरचं जळण्यासाठी !! पण हे का आणि कशासाठी ??
mysterious shadow behind dark backdrop

विरोध || कथा भाग ३ || MARATHI LOVE STORY ||

"कुठ गेली होतीस प्रिती ?? आणि तुझा फोन बंद का लागतोय ?? "स्वतःला सावरतच प्रिती बोलते. "मैत्रिणीकडे गेले होते!!!" "यायला उशीर का झाला ??" "झाला उशीर !! जाऊदे ना आता !! जाऊन झोप बर तू !!" प्रिती थोड्या चिडल्या आवाजात बोलते. "कुठ गेली होतीस प्रिती !! खरं सांग !! त्या अनिकेतला भेटायला गेली होतीस ना ??" प्रिती अगदी रागात येत म्हणाली.
brown wooden house surrounded with trees and plants

स्वप्न || कथा भाग १ || MARATHI KATHA ||

"स्वप्नातल्या ध्येयास तू उगाच फुंकर घाल वेड्या मनास आज तू उद्याची साद घाल नसेल सोबती कोणी तरी एकटाच तू पुढे चाल मागे उरले काय ते पाहण्या मनास आवर घाल..!

© 2022 - ALL RIGHTS RESERVED
facebook twitter youtube instagram pinterest