मित्रांनो रस्ता आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. .रोज कुठेतरी जायचंय म्हणुन आपण निघतो आणि कित्येक खड्डामध्ये अडखळतो .. मध्यंतरी माझ्या जवळच्या कित्येक लोकांच्या घटना ऐकायला आल्या की.. आमच्या इकडे रस्त्याच नीट नाही. गेली कित्येक वर्षे. . कोणी रस्ता नीट नाही म्हणुन जीव गमावतो .. कित्येक अॅमब्युलंस रस्ता नीट नाही म्हणुन दवाखान्यात लवकरत पोहचत नाहीत आणि परिणामी रुग्णांचा जीव जातो.. कित्येक अपघात रस्त्यावर खड्डे असल्याने होतात.. .. मग रस्ते नीट का होतं नाहीत. मला कळतं तस आमच्या इकडचा बार्शी कुर्डूवाडी रस्ता खराबंच आहे.. आता तर त्याची अवस्था याहुनही वाईट आहे. . अशात या रोडवर मी कित्येक अपघाताचे प्रसंग ऐकले ज्यात कित्येक लोकांनी आपला जीव गमावला .. मग याला जबाबदार तरी कोण तुम्ही की सरकार ..तर जबाबदार आपली सहनशीलता आहे.. कारण रस्ता म्हटलं की खड्डा आहेच हे आपण मनाला ठरवुनच टाकलंय.. मग विकास होतो तरी कुठे ते तरी कळु द्या आम्हाला. .कित्येक वेळा कुठे जायला निघालं की घरचे म्हणतात तिथे पोहचलास की फोन करं.. तेव्हाच त्यांना बरं वाटतं.. बोलण्यासाठी खुप आहे मित्रांनो .. पण आता सहन करणं म्हणजे मुर्खपणा होईल.. अजुन किती जीव गेल्यावर रस्ते नीट होतील ..कारण मरतो तो सामान्य माणुस ज्याला आता या काळात आवाज उरलेलाच नाही..
एक खंत माझी …

‘खड्ड्यातुन रस्ता .. !!’

"कोणीच काही बोलत नाही
 मनके गेले झिजून!!
 खड्ड्यातून चालतो आम्ही आता
 सवय झाली सोसून!!

 कधी इकडुन खड्डा दिसतो
 जातो त्याला चुकवून!!
 कळतच नाही तेव्हा आम्हाला
 दुसरा खड्डा पाहून!!

 रस्ते दुरुस्ती केली पाहिजे
 सगळेच थकले बोलुन!!
 गेले कित्येक जीव तरी
 गप्प सगळे बघून!!

 आले कित्येक नेते आणि
 बोले सगळं भरभरून!!
 खड्डेमुक्त महाराष्ट्र करतो
 बोले फक्त तोंडभरून!!

 कित्येक निधी याचे मंजुर
 खड्डे न हाले जागेवरुन!!
 रोजच सोसतो उद्याही सोसु
 इलाजच नाही त्यावाचून!!

 बुजलेच जर खड्डे सारे
 बोलायच तरी कशावरून!!
 गेले कित्येक जीव तरी
 गप्प सगळे बघून…!!"

 ✍योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*
SHARE