"तो दरवाजा उघडला होता
 तीच्या डोळ्यात पाणी होते!!
 आईची खंत काय आहे
 ते मन आज बोलतं होते!!

 नकोस सोडुन जावु मजला
 मी काय तुला मागितले होते!!
 एक तु,तुझे प्रेम
 बाकी काय हवे होते!!

 आयुष्य तुझे घडवताना
 मी माझे क्षण वेचले होते!!
 रडणार्‍या तुला मी
 कुशीत माझ्या ठेवले होते!!

 आज अश्रु माझे आहेत
 ते ही मी लपवले होते!!
 अनाथ म्हणुन मला सोडताना
 ते दार तु उघडले होते!!

 शाळेत तु जाताना
 येण्याची वाट मी पाहत होते!!
 आज मला तु सोडताना
 परतुन यावेस हेच मला वाटत होते!!

 आई आई म्हणारे माझे बाळ
 आज कुठे हरवले होते!!
 पळत येऊन मिठी मारणारे
 अनाथ मला करुन गेले होते!!

 माझा हात धरुन चालणारे बाळ
 तो दरवाजा आज उघडत होते!!
 आणि आईची खंत काय आहे
 ते मन स्वतःलाच आज बोलतं होते!!"

 योगेश खजानदार 

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

सांजवेळ || SANJVEL MARATHI POEM ||

ती झुळूक उगा सांजवेळी मला हरवून जाते मावळतीच्या सुर्यासवे एक गीत गाते त्या परतीच्या पाखरांची …
Read More

आई बाबा .. || Aai Baba Marathi Poem!!

आई तुळशी समोरचा दिवा असते बाबा त्याचा मंद प्रकाश असतात आई अंगणातील रांगोळी असते बाबा त्या रांगोळीतला…
Read More

बाबा || BABA || KAVITA MARATHI ||

उसवलेला तो धागा कपड्यांचा कधी मला तू दिसुच दिला नाही मला नेहमीच नवीन कपडे घेतले पण स्वतःसाठी एकही…
Read More

शब्द माझे || MARATHI STATUS ||

“लिहिल्या कित्येक शब्दांनी मलाच बोल लावले आहेत माझ्या मनातल्या तुझ्या ते प्रेमात नकळत पडले आहेत…
Read More
Scroll Up