"बोलावंसं वाटलं तरी , काय बोलावं , कधीच कळलं नाही!! समुद्राच्या लाटेने ते मन, नकळत ओल केलं तरी, मनास ते कधीच कळल नाही!! सारा भार त्या अश्रूनवर होता , पण अश्रूंनी कधीच तक्रार केली नाही!! गालावर ते ओघळले आणि, एकांताची आठवणही झाली नाही!! किनारा तो साथ देताना, काहीच बोलला नाही!! लाटेच्या त्या पुन्हा पुन्हा येण्याची त्याने, साधी चाहूलही दिली नाही!! खरंच त्या भरती आणि ओहोटी मध्ये, एक क्षणही शोधता आला नाही...!!!" © योगेश *ALL RIGHTS RESERVED*