मी आजही त्या क्षणाना तुझ्याच आठवणी सांगतो!! कधी शोध माझा नी तुझ्यातच मी हरवतो!! नसेल कदाचित वाट दुसरी मी तुलाच या ह्रुदयात पाहतो!! पण तुझ्या नसण्याचे अस्तित्व लपवत मी राहतो!! हो खोटीच ही दुनिया माझी तुझ्यासवे मी त्यात असतो!! जिथे तुझे नी माझे कित्येक स्वप्न मी पाहतो!! सांगु कसे या मनास कोणते दुःख मी बोलतो!! तुझ्या विरहाचे क्षण खोडण्यचे व्यर्थ प्रयत्न मी करतो!! हे असे का मनाचे धागे मी गुंतवतो!! मनाच्या खेळात आज का स्वतःस मी शोधतो!! हो आहे आजही मी तिथेच त्या वळणावरती थांबतो!! त्या वाटेवरती वाट पहात तुझी क्षणांना तुझ्याच आठवणी सांगतो!! ✍ योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
