क्षण सारें असेच, का निघून जातात?? वर्षा मागून वर्ष, मागे पडत जातात !! कुठे गोड आठवांचा, गंध ठेवून जातात , कूठे उगा अश्रूंचा, बांध भरून जातात !! क्षण सारें असेच , खूप बोलून जातात , जणु कोणाचे शब्द, मनास बोलत राहतात !! रुसव्यात त्याची समजूत, जणु काढत रहातात !! एकांतात माझ्याशी उगा, का भांडत रहातात?? क्षण सारें असेच, जीव लावून जातात !! परतून येण्याचे का? वचन देऊन जातात!! मागे वळून पाहता , दूर का भासतात ?? डोळे बंद करता, जवळ का येतात ?? क्षण सारें असेच , अनोळखी होऊन जातात !! पाहता पाहता का?? अबोल होऊन जातात !! हृदयाच्या कोपऱ्यात का? घर करून राहतात !! आपलेच चेहरे विसरून, परक्यास आठवतं राहतात !! क्षण सारें असेच, शब्द होऊन जातात !! लिहून घेतल्या कागदात , मन मोकळं राहतात !! कधी प्रेमाची आठवण, जणु करत रहातात !!! शेवटच्या ओळीत का ?? सारं बोलून जातात !! क्षण सारें असेच, पाऊस होऊन जातात !! भेफान बरसताना का ?? स्वतःस विसरून जातात !! कूठे ओल कायमची, मनात ठेवून जातात !! कूठे नुसता आभास, उगाच देऊन जातात !! क्षण सारें असेच , नदी होऊन येतात !! कूठे वाट डोंगराची, कूठे उंचावरून कोसळतात !! सारं काही सोबत, जणु घेऊन येतात!! अखेर त्या समुद्रात, स्वतःस हरवून जातात !! क्षण सारें असेच, का निघुन जातात ?? ✍️ योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
