आयुष्यात जगताना आपण विसरुन जातो आपल्याच लोकांना.. पण जेव्हा आयुष्याची संध्याकाळ होते तेव्हा त्याच लोकांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. एक कविता ..
"आयुष्य क्षणा क्षणात जगताना विसरून जातो आपल्याना भेटायला कधी मावळतीकडे पहाताना वळुन पाहतो आपल्याच सावल्यांना नाही म्हटलंच तरी आठवणींत या कोणीतरी दिसतो आपली साथ द्यायला आयुष्यभर डावलेल्या नात्यात का हाक देतो पुन्हा पुन्हा बोलायला मी आणि माझे आयुष्य म्हणताना का विसरलो आपुलकीच्या मित्रांना पुन्हा नव्याने ओळख करण्यास का दिसली आठवण ती सावल्यांना हळुवार निघुन जाताना हे जीवन विसरलोच मी स्वतःला ओळखायला कळले जेव्हा सारे हे ज्या वेळी सुर्यास्त झाला का या जीवनाचा पण मनात होती एक आस पुन्हा सुंदर असावा क्षण अखेरचा जणु रम्य सांजवेळीचा तो प्रवास..!" -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
READ MORE
आई !! तू ना अडाणी आहेस! तुला ना काहीच कळत नाही !!! आई!! किती आउटडेटेड आहे हे सगळं !! प्रत्येक…
आई तुळशी समोरचा दिवा असते बाबा त्याचा मंद प्रकाश असतात आई अंगणातील रांगोळी असते बाबा त्या रांगोळीतला रंग असतात
आई तुळशी समोरचा दिवा असते बाबा त्याचा मंद प्रकाश असतात आई अंगणातील रांगोळी असते बाबा त्या रांगोळीतला रंग असतात आई…
तुमच्या बद्दल लिहिताना कित्येक विचार येतात बाबा आणि प्रत्येक शब्द मला कित्येक भाव सांगतात
रात्री आकाशात पहाताना चांदण्याकडे बोट करणारा माझ्या लुकलुकत्या डोळ्यात स्वप्न पहाणारा आणि त्या स्वप्नातही स्वतःला पहाणारा बाबा तुच होतास कधी…
वाट सापडत नसताना आपल्या मुलांना योग्य मार्ग दाखवणारे ते बाबा असतात. आपल्या मुलाला बोट धरुन चालायला शिकवणारे ते बाबा असतात.…
उसवलेला तो धागा कपड्यांचा कधी मला तू दिसुच दिला नाही मला नेहमीच नवीन कपडे घेतले पण स्वतःसाठी एकही घेतला नाही
बाबा मनातल थोडं आज सांगायचं आहे!! बस जरा थोडा वेळ तुझ्याशी बोलायच आहे!! किती कष्ट करशील हा संसार चालवशील!! माझ्या…
बाबा म्हणारी ती राजकुमारी एवढी लवकर का मोठी व्हावी तिच्या आयुष्यात राजकुमार यावा आणि या राजाची झोप का उडावी कधीतरी…
असंख्य वेदनांचा त्रास होऊनही सहन करणारी फक्त आईच असते कधी सहज तर कधी कठोर वागणारी मनास संस्कार देणारी आईच असते
Comments are closed.