क्षणभर सखे या आठवांचा, भार नकोसा होतो!! तुझ्यासवे त्या भेटीचा जणू, गंध हरवून जातो !! शोधणे ते उगाच वाटे , दिशाहीन मी होतो !! सांगणे त्या मनास वाटे, उगाच जीव जातो !! का उगाच मग कल्लोळ, भावनांचा त्या होतो!! तुझ्याविण न भेटल्या का ? शब्दास विसरून जातो !! लिहितो कित्येक पानावरी जणू, तुझाच स्पर्श होतो !! नकळत मग जगात त्या, अलगद निघून जातो !! दिसे चेहरा कोणता मग, भास तुझा होतो !! चिंब भिजल्या वाटेवरी का ?? उगाच पाहत जातो !! थांबून पुसता फुलांस त्या, तोही अनोळखी होतो !! सरी त्या बरसत राहतात, मी चालत जातो !! सांग सखे कोणते मी, नाते जपत होतो !! श्वास तो असा की? हळूवार बोलून जातो !! हाक ती मनापासून येता, आवाज बंद होतो !! प्रेम मी व्यक्त करता, तुझ्यात मिसळून जातो !! प्रेम मी व्यक्त करता, तुझ्यात मिसळून जातो !! ✍️© योगेश खजानदार
