कोऱ्या कागदावर || KAGAD MARATHI POEM ||

Share This
"तासनतास कोऱ्या कागदावर
 तुझ्याचसाठी मी लिहावे
 कधी नकळत ते शब्दही तेव्हा
 तुझ्याच प्रेमात पडावे!!

 मी विसरून शोधतो तुला
 स्वप्नांच्या या जगात रहावे
 आणि सुराच्या सवे मी तेव्हा
 गीत तुझेच गावे!!

 कसे हे वेड लागले मझला
 स्वतःस मग विसरून जावें
 तुलाच पाहण्या या वेड्या नजरेने
 पापण्यास विसरून जावे!!

 कधी अकारण बोलण्याचे बहाणे
 तुलाही कळून मग यावे
 कधी कारण भेटण्याचे तुला नी
 मनातले जणु ओठांवर न यावे!!

 सखे असे का मन हे बावरे
 तुलाच न कळावे
 प्रेम हे माझे किती तुझ्यावर
 तुलाच का न सांगवे?

 ओठांवरील शब्दही तेव्हा
 ओठांवरच का राहावे?
 कधी नकळत तेही तेव्हा
 तुझ्याच प्रेमात पडावे!!

 आणि तासनतास कोऱ्या कागदावर
 तुझ्याचसाठी मी लिहावे!!!
 ✍ योगेश खजानदार

READ MORE

तुझ्यात मी ..!! Tujyat Mi !!

समोर तु असताना तुझ्यात मी मिळून जाते तुझ्यासाठी कविता लिहिणारे ते ह्रदय ही निशब्द होऊन राहते शोधते …
Read More

आठवणं || EK AATHVVAN REM KAVITA ||

तुझी आठवण यावी अस कधीच झालंच नाही तुला विसरावं म्हटलं पण विसरता ही येत नाही कधी स्वतःला विचारलं …
Read More

सांजवेळ || SANJVEL MARATHI POEM ||

ती झुळूक उगा सांजवेळी मला हरवून जाते मावळतीच्या सुर्यासवे एक गीत गाते त्या परतीच्या पाखरांची …
Read More

आठवणं || AATHVAN || KAVITA || LOVE ||

इतक जड व्हाव ओझं त्या आठवणींच की आयुष्यभर फक्त एक सोबत त्यांची नसते सुटका त्यातुन बाहेर पडावी अशी की…
Read More

लहानपणं || MARATHI BHASHA || KAVITA ||

कधी कधी वाटतं पुन्हा लहान व्हावं आकाशतल्या चंद्राला पुन्हा चांदोबा म्हणावं विसरुन जावे बंध सारे आणि…
Read More

एक लाट. !! EK LAAT

अलगद स्पर्श करून जाणारी समुद्राची ती एक लाट प्रत्येक वेळी नव्याने भेटणारी पाहात होती माझीच वाट…
Read More

भेट !! Bhet !!

एक गोड मावळती रेंगाळूनी तिच्या नजरेच्या कडात हरवूनी उरल्या कित्येक आठवणींत ती बोलकी एक भेट…
Read More

एक तु…  !! Ek Tu

त्या वार्‍यानेही तुला छळावे सतत तुझे केस उडावे तु त्यास पुन्हा सावरावे तरी तो ऐकत नाही ना बघुन ए…
Read More

शब्द माझे || MARATHI STATUS ||

“लिहिल्या कित्येक शब्दांनी मलाच बोल लावले आहेत माझ्या मनातल्या तुझ्या ते प्रेमात नकळत पडले आहेत…
Read More

एक वाट ती || TI MARATHI KAVITA ||

शोधुनही सापडेना एक वाट ती हरवली सांज हरवली रात्र ती नभी एक चांदणी पाहते कुणा ती मझ सांगते पहा सोबतीस…
Read More

बालपण || BALGIT || POEMS ||

आभाळात आले पाहुणे फार ढगांची झाली गर्दी छान पाऊस दादांनी भिजवले रान रानात साचले पाणी फार मित्रां…
Read More

Next Post

दुर्बीण (कथा भाग ४) अंतिम भाग || INSPIRATIONAL STORY||

Sat Nov 11 , 2017
पण तेवढ्यात सदाने आई आणि बाबांना हाक मारली. दोघेही लगबगीने बाहेर आले. आणि सदा बोलत म्हणाला. "आई बाबा तुम्हाला माहितेय गेली ३ ४ दिवस मी कशाचा अभ्यास करत होतो??" सदा दोघांकडे बघत प्रश्न विचारत होता.