"तासनतास कोऱ्या कागदावर तुझ्याचसाठी मी लिहावे कधी नकळत ते शब्दही तेव्हा तुझ्याच प्रेमात पडावे!! मी विसरून शोधतो तुला स्वप्नांच्या या जगात रहावे आणि सुराच्या सवे मी तेव्हा गीत तुझेच गावे!! कसे हे वेड लागले मझला स्वतःस मग विसरून जावें तुलाच पाहण्या या वेड्या नजरेने पापण्यास विसरून जावे!! कधी अकारण बोलण्याचे बहाणे तुलाही कळून मग यावे कधी कारण भेटण्याचे तुला नी मनातले जणु ओठांवर न यावे!! सखे असे का मन हे बावरे तुलाच न कळावे प्रेम हे माझे किती तुझ्यावर तुलाच का न सांगवे? ओठांवरील शब्दही तेव्हा ओठांवरच का राहावे? कधी नकळत तेही तेव्हा तुझ्याच प्रेमात पडावे!! आणि तासनतास कोऱ्या कागदावर तुझ्याचसाठी मी लिहावे!!! -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
