Share This:
 चांदण्यात फिरुनी शोधला चांदोबा
 शुभ्र दुधात पाहता हसला लाजरा
 पसरून चोहीकडे हरवला तो बावरा
 लख्ख प्रकाशाने जणू खुलला तो चांदोबा
 चांदणी जणू त्यास हळूच पाहता
 लाजून त्यास उगाच लपता
 त्या रात्रीत जणू त्यास हळूच भेटता
 चंद्रास पाहून चांदणी अल्लड हसता
 ती रात्र जणु अलगद उमलता ..!!
 ✍योगेश