चांदण्यात हरवून, रात्र ती आज गेली!! चंद्र तो सोबती, परी शोधसी न कोणी !! लख्ख तो प्रकाश, बोलतो न काही !! हळूवार ती झुळूक, अलगद येऊन जाई!! परी सांडले ते चांदणे, पाना फुलांत काही !! शुभ्र वस्त्र जणू ,पांघरूण आज येई !! कुठे उगाच भास, त्या रात्रीचा येई!! परी आभास का उगाच, मनास आज होई !! जागले ते नभ , झोप न आज येई!! बोलते त्या चंद्रास , कवेत आज घेई !! साऱ्या आसमंतात, बहरून आज जाई!! कोणती ही हुरहूर , मनात त्या होई!! चांदण्यात हरवून, रात्र ती आज गेली!! ✍️© योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*