कुठे शोधुन सापडेल!!! || KAVITA MARATHI ||

"कुठे शोधुन सापडेल
 मनातील भाव सखे
 न बोलता न ऐकता
 तुला कळणारे
 डोळ्यात माझ्या दिसताच
 मनास तुझ्या बोलणारे
 आणि ओठांवर न येताच
 तुला ऐकु येणारे!!

कुठे शोधुन सापडेल
 हरवलेले क्षण प्रिये
 आठवणींच्या घरात
 पुन्हा गर्दी करणारे
 वळणावरती आज
 पुन्हा जाऊन थांबणारे
 आणि वहीच्या पानांमध्ये
 तुला फक्त पाहणारे!!

कुठे शोधुन सापडेल
 लपलेले ते प्रेम सखे
 तुझे नाव घेताच
 खुप काही बोलणारे
 मनातील भावनेला
 कवितेत लिहिणारे
 हरवलेल्या क्षणांना
 ओठांवर गुणगुणारे
 आणि लपलेल्या प्रेमाला
 सुरांत शोधणारे!!

कुठे शोधुन सापडेल
 मनातील भाव सखे!!!"

 - योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

सांजवेळ || SANJVEL MARATHI POEM ||

ती झुळूक उगा सांजवेळी मला हरवून जाते मावळतीच्या सुर्यासवे एक गीत गाते त्या परतीच्या पाखरांची …
Read More

शब्द माझे || MARATHI STATUS ||

“लिहिल्या कित्येक शब्दांनी मलाच बोल लावले आहेत माझ्या मनातल्या तुझ्या ते प्रेमात नकळत पडले आहेत…
Read More

Next Post

राख... !!! || RAKH MARATHI KAVITA||

Sun Oct 9 , 2016
ती शांतता वेगळीच होती रडण्याची जाणीवही होती लाकडास पेट घेताना आकाशात झेप घ्यायची होती आपलंस म्हणारी कोण होती अश्रु ती ढाळत होती मन ओल करताना मला आगीत पहात होती