"कुठे शोधुन सापडेल?? मनातील भाव सखे!! न बोलता न ऐकता, तुला कळणारे!! डोळ्यात माझ्या दिसताच, मनास तुझ्या बोलणारे!! आणि ओठांवर न येताच, तुला ऐकु येणारे!! कुठे शोधुन सापडेल?? हरवलेले क्षण प्रिये!! आठवणींच्या घरात, पुन्हा गर्दी करणारे!! वळणावरती आज, पुन्हा जाऊन थांबणारे!! आणि वहीच्या पानांमध्ये, तुला फक्त पाहणारे!! कुठे शोधुन सापडेल? लपलेले ते प्रेम सखे!! तुझे नाव घेताच, खुप काही बोलणारे!! मनातील भावनेला, कवितेत लिहिणारे!! हरवलेल्या क्षणांना, ओठांवर गुणगुणारे!! आणि लपलेल्या प्रेमाला, सुरांत शोधणारे!! कुठे शोधुन सापडेल, मनातील भाव सखे!!!" - योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
