"नको पैसा , नको बंगला
  मला फक्त सुख हवं
  छोट्याश्या घरात माझ्या
  एक हसर कुटुंब हवं!!

 नसेल कोणती हाव त्यास
  मिळेल त्यात समाधानी हवं
  आलेच अश्रू डोळ्यात तरी
  अलगद ते पुसणार हवं!!

 छोट्या छोट्या गोष्टीतही
  खूप आनंद घेणार हवं
  असेल गरीबी घरात माझ्या
  मनाने ते खूप श्रीमंत हवं …!!"

 छोट्याश्या घरात माझ्या
  एक हसर कुटुंब हवं ..!!

 ✍योगेश

*ALL RIGHTS RESERVED*
Share This:
आणखी वाचा:  मी एक क्षण || MI EK KSHAN || KAVITA ||