किनारा.. || KINARA POEM ||

Share This
"पावलं चालतात त्या समुद्र किनारी
 आठवणीत आहे आज कोणी!!
 सुर्य ही अस्तास जाताना
 थांबला जरा मझं जवळी!!

 ती लाट पुसते मज काही
 आठवण असते तरी काय ही?
 मझं सारखे पुन्हा पुन्हा येताना
 ओलावते का मन ती!!

 तो बेफान वारा बोलतो काही
 आठवण म्हणजे विचारतो काय ती?
 मझं सारखे मुक्त फिरताना
 जाणवते का मनास ती!!

 ती शुभ्र चांदणी येते आकाशी
 सांग म्हणते आठवण काय ती?
 मझं सारखे लुकलुकताना
 तुटते का अचानक ती!!

 कसे सांगावे काय ती
 आठवण असते जाणीव ती!!
 मनातुन चांदणे तुटताना
 ओलावते डोळे ती!!"

 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

असे कसे हे || Love POEM ||

वाट ती तुझ्या येण्याची!! आता पाहवत नाही !! क्षणात यावे तुझ्या जवळ!! पण ते शक्य होत नाही !! सांग काय…
Read More

तो पाऊस || PAUS MARATHI KAVITA ||

“तो पाऊस आणि ती खिडकी मला खूप काही बोलतात आठवणींच्या कित्येक थेंबात मला चिंब भिजवून जातात कधी अगदी …
Read More

Next Post

मुसाफिर || MUSAFIR KAVITA ||

Wed Jan 4 , 2017
कदाचित त्या वाटा ही तुझीच आठवण काढतात तुझ्या सवे चाललेल्या क्षणास शोधत बसतात पाऊलखुणा त्या मातीतून भुतकाळाची साक्ष देतात एकट्या या मुसाफिरास