खुप दिवसांनी प्रिया आपल्या जुन्या मैत्रिणीला भेटतं होती. तिच्याशी मनसोक्त गप्पा मारण्यात स्वतःला ती हरवली होती. ते काॅलेज, तो काॅलेजचा कट्टा आणि ती धमाल यात काॅफीचे दोन दोन कप केव्हा संपले ते दोघींनाही कळालं नाही.
“तुला आठवतं सुमन, पुण्याला साहित्य संमेलनाला गेलो होतो तेव्हा किती मज्जा आली होती. त्यावेळी तु पुण्यात हरवली होतीस! !आणि तुला शोधायला गेलेले जोशी सरही पुन्हा हरवले होते! !तु सापडलीस पण सर काही सापडले नाही! !!दिसले ते थेट पुन्हा वर्गातच! !”
या आणि अशा कित्येक आठवणींनी दोघींच मन अक्षरशः आनंदुन गेलं होतं.
“काय गं सुमन!! शेखर कसा आहे? !प्रियाने सहजच सुमनला विचारलं.

शेखरंच सुमनवर काॅलेज मध्ये असतानाच खुप प्रेम होतं. त्यांनी पुढे लग्नही केलं होतं. पण प्रियाच्या या प्रश्नाने सुमन मात्र शांत झाली
“मी आणि शेखर एकत्र राहत नाहीत आता!!” सुमनच्या या उत्तराने प्रियाला धक्काच बसला.
“का, काय झालं सुमन?”
“लग्नानंतर आमचं काही जमेचना!! सतत वाद !! आणि त्याच ते सतत दारु पिणं, याला वैतागुन मीच निर्णय घेतला! !”
“इतकं सहज विसरता येतं हे सगळं?” 
“आठवुन त्रास होणार असेल तर विसरलेलंच बरं नाही का?” 
तिच्या या उत्तराने प्रिया निशब्द झाली. काॅलेजात मी तुझ्या शिवाय राहुच शकणार नाही अशा शपथा घेणारे हे प्रेमी युगुल. जीवनाच्या सागरात दोन क्षणही टिकु शकले नाही याचंच नवल वाटत होतं
सुमन मात्र पहिल्या पासुन हुशार होती. आताही तिने स्वतःची कंपनी काढुन. स्वतःला कामात व्यस्त करुन घेतलं होतं. पण दुखाची ही सल ती प्रिया पासुन लपवु शकली नाही. कित्येक वेळ नजर चुकवत होती.पण ती प्रियाच्या डोळ्यात पहाताचं. अश्रु अनावर होऊन रडु लागली. आपल्या दुखी प्रेमाची कथा ती प्रियाला सांगु लागली. 
“अखेर निघुन जाताना त्याला मला थांबवावंस सुद्धा वाटलं नाही,  याचंच जास्त दुख वाटतं !! काॅलेजात असताना कित्येक गोड स्वप्न त्याने मला दाखवली होती. पण सगळी ती खोटी ठरली!! राहिला तो फक्त दुखाचा डोंगर. !! मनातील वादळास शांत व्हावयचं होतं. पण कुठे? ! म्हणुन स्वतःला कामात व्यस्त करुन घेतलं. पण मनातली सल काही केल्या जात नाही!!” सुमनचा आवाजात एक आर्तता होती.
प्रिया कित्येक वेळ तिचं बोलणं फक्त ऐकत होती. शेखर इतका बदलेलं अस तिला ही वाटलं नव्हतं. 
“सुमन, ऐवढं सगळं घडलं तरी तु मला काहीच का कळवलं नाहीस!! तरी तुझ्या बाबांचा नकार होताच या लग्नाला !! ते का आज कळतेयं!! माणसं चुकतात कधी कधी! ! पण त्याचं इतकं वाईट वाटुन घ्यायचं नसतं !! शेखरंचा विषय केव्हाच संपलाय आता !!”
“हो पण आठवणी विसरल्या जात नाहीत!!” सुमन अश्रु पुसत म्हणाली.
“मगं त्यावर नवीन रंगरंगोटी करायची म्हणजे जुन सगळं झाकलं जातं!!” प्रियाच्या या उत्तरानं सुमन गालातच हासली. 
“म्हणजे नेमकं काय करायचं?”  सुमन हसतंच बोलली.
“म्हणजे ना !!  अजुन एक एक कप काॅफी घ्यायची! !आणि अजुन रडलीस तर अजुन दोन कप!!! “
प्रियाच्या या बोलण्याने सुमन खळखळून हसली. मनातील दुखावर मैत्रीची ही काॅफी रंगरंगोटी करुन गेली.
दुखाला काॅफीच्या वाफेत विरुन गेली अगदी कायमचं..
“काही क्षण माझे
काही क्षण तुझे
हरवले ते पाहे
मिळवले ते माझे

मी एक शुन्य
तु एक शुन्य
तरी का हिशेबी
मिळे एक शुन्य

करता आठवण
उरी एक सल
मिळे मझ अखेर
पुन्हा एक क्षण

असे ही उरले
तसेही का उरले
जगायचे ते मिळवुन
क्षण ते उरले
अश्रु ते सोबती
मित्र हे सोबती
सल विसरुन जाते
आपले ही सोबती

मग का राहिले
जगायचे जे राहिले
हसुन घे थोडेसे
हसायचे जे राहिले!!!”

समाप्त

✍️योगेश

SHARE