"ती मला नेहमी म्हणायची कवितेत लिहिलंस का कधी मला!! माझ्यासाठी लिही म्हटलं तर सुचतंच नाही का रे तुला!! इतक सार लिहिताना आठवलंस का कधी मला! वाटतं एकदा डोकावून मनातुन वाचावं तुला!! तुझ्या शब्दाच्या दुनियेतुन मनसोक्त पहावं मला!! माझेच मी हरवुन जाताना कवितेतुन मिळावे तुला!! तुझ्या डोळ्यांत दिसते ती मी पहायची आहे मला!! शब्दांना सोबत घेऊन मनातलं बोलायचं आहे तुला!! कवितेत तुझ्या एकदा तरी लिही ना रे मला!! का ? माझ्यासाठी लिही म्हटलं तर सुचतंच नाही का रे तुला …!!" -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
