"सोबतीस यावी ती!!
 उगाच गीत गुणगुणावी ती!!
 अबोल नात्यास या!!
 पुन्हा बहरून जावी ती!!

 रिमझिम पाऊस ती!!
 एक ओली वाट ती!!
 मनातल्या आकाशात या!!
 इंद्रधनुष व्हावी ती!!

 अनोळखी वाट ती!!
 अनोळखी सोबत ती!!
 पुन्हा नव्याने चेहर्‍यास या!!
 नवीन ओळख द्यावी ती!!

 कधी चांदण्यात शोधावी ती!!
 कधी लाटांमध्ये मिळावी ती!!
 अंधारल्या रात्रीस या!!
 कधी चंद्रामागे पहावी ती!!

 मनात या रहावी ती!!
 कधी न विसरावी ती!!
 मनातल्या मनात या!!
 कवितेत रोज लिहावी ती!!"
 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*
SHARE