संसाराच्या या कवितेत कधी मी बोलेल तर कधी ती!! प्रश्न माझे असतील आणि उत्तरे देईल ती!! सांभाळून घ्या हा मला आता सांगते आहे मी!! चुकलंच काही सांगताना त्याचीं माफी मागते मी!! कधी कधी विसरून गेलो तर किती रागावते ती? आहो विसरून गेलात म्हणून, संसारात बघा म्हणते ना मी!! संसाराचा गाडा सुरळीत चालवतोच ना मी?? पण थोड लक्ष द्या म्हटलं तर कुठ बिघडल म्हणते मी ?? सकाळी उठून ऑफिसला जातोच मी ? ऑफिसला जाताना न चुकता डबा देतेच ना मी!! खरंच सांग आता मला ,तुझ्या मनातल ओळखू कस मी ? हे पाहिजे ते पाहिजे तुझ्या मागण्या किती ? आता निघालाच विषय म्हणून सांगते आहे मी!! घरातलं काही संपलं तर सांगायचं कोणाला मी!! सारखं सारखं काहींना काही संपत कस म्हणतो मी ?? माझ्या माहेरचे येत नाहीत संपवायल सांगते बरं मी!! संसाराच्या या कवितेत कशी बोलते बघा ती!! आहो आधीच म्हणाले ना चुकलं काही तर माफी मागते मी!! घरात बसून नुसती हुकुम सोडते बघा ती!! घरातलं सार काम करते ,त्याच कौतुक करा म्हणते का मी!! कष्ट करून पैसा कमावतोच ना मी!! पैसा पैसा जोडून संसार सजवतेच ना मी!! कसे असतात संसाराचे सुर सांगू कसे मी!! कधी वाद कधी प्रेम यातच नेहमी सापडते मला ती!! म्हणूनच संसारात कधी ते बोलतात कधी मी प्रश्न त्यांचे असतात आणि उत्त्तर देते मी !!! ✍योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*