कविता : कपाट
सादरीकरण आणि लेखन : योगेश
“कथा कविता आणि बरंच काही!!” या YouTube Channel ला Follow करा.
“मनाचं कपाट, अगदी अलगद उघडाव
नाहीतर नकळत आठवणींच..
बोचक अंगावर येत.!!
मग अस्ताव्यस्त होऊन सर्वत्र पसरत
आणि उगाच मग गोंधळ होतो ..!!आवराव म्हटलं तरी मग ते ..
उगाच गुंतत जातं ..!!
कधी कोणाच्या प्रेमाची
अलगद साक्ष देऊन जात ..!!
कधी क्षणांना पुन्हा, मागे घेऊन जात ..!
कधी स्वतःच एकटं, हसत राहतं ..!!
हे आठवणींच बोचक आहेना ..!!
पुन्हा ते क्षण दाखवून जात !!
अगदी क्षणभर का होईना, दोन टिपूस गाळून येतं!!
एकदा तरी त्या आठवणींना, घट्ट मिठी मारून येतं ..!!
कितीही आवराव म्हटलं तरी ..!!
तितकंच ते पसरत जातं ..!!आणि मग,
पुन्हा त्या कपाटाकडे पाहताना,उगाच वाटत.!!
हे आठवांच बोचक , एवढं कधी जमा केलं ..!!
क्षण क्षण जगताना , लक्षही नाही दिलं!!
एवढ्याश्या कपाटात, सारं आयुष्य रीत केलं ..!!!
काही वाईट जपलं , काही आनंद देऊन गेलं..!
कुठे क्षणभर विश्रांती ,तर कुठे रखरखत उन्ह दिलं ..!
या आयुष्याने सार काही दिलं ..!!
ज्यात हे मन आणि त्या मनात आठवणींच ..!!
एक छोटंसं कपाट त्याने दिलं …!!”✍️©योगेश खजानदार
Thank you
You can listen this poem as tribute on my youtube channel
https://www.youtube.com/channel/UChLZ4rvdjwVFDCvXY59iuAA
जी जरूर 🙏🙏🙏
मैंने भी कोशिश की है ‘सुशांत सिंह राजपूत’ के लिए कुछ लिखने की शायद आप उन भावनाओं को और गहराई से समझ पाए। वक़्त निकाल के पढियेगा जरूर।🙏🙏