शीतल लांबुनच सर्वांना पाहताना थोडी आपल्याच विश्वात हरवून गेली. तिचे बाबा तिच्या जवळ केव्हा आले हे तिला कळलं ही नाही.
" थोड बोलायचं होत तुझ्याशी शीतल !! शीतल !!"
शीतल भानावर आली आणि बाबांना म्हणाली.
"बोला ना बाबा !!
"डॉक्टर पाठक यांना भेटलीस ना ??त्यांनी मला सगळं काही सांगितलं !! तुला मी याबद्दल बोलणार त्यापूर्वी तुझ्या सासूबाईंचा फोन आला आणि माझं बोलणं राहून गेलं."
"बाबा ते ! मी .. मी!! "
"काही बोलू नकोस शीतल !! Abortion साठी गेलीस तू त्यांच्याकडे !! माहितेय ना तुला तो कायद्याने गुन्हा आहे ते !! अस करता नाही येत ते बाळा !! डॉक्टर पाठक माझे चांगले मित्र आहेत त्यांनी तुझी कशीतरी समजूत काढून तुला घालवून दिल. त्यांनाही हे अनपेक्षित होत !! "