"मंदिराची दार बंद करून !! दारूची दुकानं उघडली !! काय रे भगवंता ! कोणती ही वेळ आणली !! गरिबाच्या बुडावर काठ्या !! श्रीमंताच्या पायी सत्ता आली !! गरीब भुकेने मेला !! श्रीमंतांची मजा मस्ती करून झाली !! तुझ्या अन्नछत्राच्या खाली , कित्येक गरीब जेवून गेली !! आणि तुझ्याच दारात म्हणे, रोगराई हसहसत खेळून गेली !! दारूच्या गुत्त्यावर म्हणे , लोकांनी वेड्यासारखी गर्दी केली !! आणि गूत्त्याच्या दरवाज्यात म्हणे , रोगराई वासानच मरून गेली !! तुझ्या भेटीविना आज !! भक्तांची काय अवस्था झाली !! तुझ्या दर्शनासाठी , व्याकुळ ही जनता झाली !! दारू पिऊन आता !! भुतच झिंगु लागली !! मती गेली माती झाली , संसार अशीच मोडू लागली !! चांगले दरवाजे बंद करून !! वाईटाची कास धरु लागली !! भगवंता खरंच हे कलयुग आहे !! इथे अधर्माचीच स्तुती होऊ लागली !! भगवंता खरंच हे कलयुग आहे!! इथे अधर्माचीचं स्तुती होऊ लागली !!" ✍️ योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
कोणतंही संकट आल की आपण भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की भगवंता या संकटापासून आम्हाला मुक्त कर , किंवा त्याच्याशी लढण्याची ताकद आम्हाला दे!! पण आजची परिस्थिती त्याच्या विपरीत दिसावी, याला काय म्हणावे खरंच काही कळत नाही. दोष कोणाला द्यावा आणि का ?? उद्याची येणारी पिढी यातून काय बोध घेईल हे भगवंतच जाणे, की संकट काळी आम्ही देवालय बंद करून दारूची दुकाने उघडली होती. आमच्याच स्वार्थासाठी.