कधी कधी || KADHI KADHI MARATHI POEM||

Share This:
कधी कधी मनाच्या या खेळात
 तुझ्यासवे मी का हरवतो!!
 तुला शोधण्याचा हट्ट इतका का?
 की प्रत्येक शब्दात तुला मी का लिहितो!!

 तुला यायचं नाही माहितेय मला
 तरी मी तुझी वाट का पाहतो!!
 जणु कित्येक गोष्टींचं ओझ हे
 कवितेत मी का हलके करतो!!

 बघ ना एकदा येऊन पुन्हा माझ्याकडे
 तुझ्याच आठवणीत मी कसा जगतो!!
 तुझ्याच जगात राहून, तुझ्याच विना
 तुलाच या वहीत कसा आठवतो!!

 खरं खरं सांगू तुला सखे एक
 तुला बोलण्याचे बहाणे मी कित्येक करतो!!
 पण गालावरच्या तुझ्या रुसव्याचे 
 उगाच नखरे मी पाहत बसतो!!

 तेव्हा सांग सखे येऊन एकदा त्या क्षणास
 पुन्हा अश्रूंचे तो उगाच रिन करतो!!
 पण तिथेच तु माझी आहेस हे
 तोच मला पुन्हा पुन्हा सांगत असतो!!

 भेटेशील मला कधी तू जणु
 वाटेवरती उगाच मी वाट पाहत असतो!!
 विचारून बघ त्या वळणानाही एकदा
 तुझ्याचसाठी मी रात्रं दिवस जागत असतो!!

 हे प्रेम कळेन कधीतरी तुला म्हणून
 मी उगाच या वहीत लिहीत असतो!!
 तुझ्या मनाच्या तळाशी तेव्हा मी 
 स्वतःलाच का शोधत असतो!!
 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*