ओळख..!! || OLAKH MARATHI KAVITA ||

Share This
झाल्या कित्येक भावना रित्या
 सुटले कित्येक प्रश्न आता!!
 कोण ओळखीचे इथे भेटले
 अनोळखी झाल्या वाटा!!

 साथ कोणती हवी या क्षणा
 मी असूनी का आहे एकटा!!
 नसावी त्या सावल्यांची आस
 कोणत्या या मनाच्या छटा!!

 शोध संपला सुटल्या दिशा
 मुक्त वाहतो तो आज वारा!!
 ओढ नाही मनास आता कोणती
 कसल्या बंधनाचा आता मारा!!

 का असे भेटलो मी कोणा
 विसरून सारे गुंग त्या जगा!!
 पुन्हा भेटण्यास यावे का कोणा
 की विसरून जावे माझे मला!!

 मनात पाहुनी ओळखीचा चेहरा
 मी भेटलो आज माझेच मला!!
 ओळखले मी माझेच मला नी
 हरवून गेलो मी साऱ्या जगा!!

 झाल्या कित्येक भावना रित्या
 सुटले कित्येक प्रश्न आता ..!!

 ✍योगेश

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

तुझे रुसणे || LOVE POEM ||

न कळावे मनाला काही तुझे हे भाव सखे तु रुसताना ओठांवरती हळुवार ते एक हास्य दिसे कसे समजावे डोळ्या…
Read More

एक तु || EK TU LOVE POEM ||

एक आभास मनाला तु पुन्हा मझ दिसताना पाहुनही मझ न पहाताना ..एक तु!! तुझ पापण्यात भरताना नजरेतूनी पहात…
Read More

किनारा.. || KINARA POEM ||

पावलं चालतात त्या समुद्र किनारी आठवणीत आहे आज कोणी सुर्य ही अस्तास जाताना थांबला जरा मझं जवळी ती…
Read More

राख || RAKH || MARATHI POEM ||

“सांभाळला तो पैसा न जपली ती नाती स्वार्थ आणि अहंकार ठणकावून बोलती निकामी तो पैसा शब्द हेच सोबती…
Read More

परिवर्तन || PARIVARTAN KAVITA ||

खुप काही घडाव नजरेस ते पडाव मला काय याचे मौन असेच राहणार!! सत्य समोर इथे बोलेल कोण ते शांत आहे…
Read More

आवाज || AAWAZ MARATHI KAVITA ||

आवाज आता दबुन गेला शक्ती आता संपुन गेली वाईटाच्या मार्गावर अखेर माणुसकी ही मरुन गेली कोणी कोणाला ब…
Read More

लपुन छपुन || LOVE POEM ||

न राहुन पुन्हा पुन्हा मी तुला पाहिलं होतं लपुन छपुन चोरुन ही मनात तुला साठवलं होतं कधी तुझ हास्य…
Read More

Next Post

उन्हाळ्याच्या सुट्टीत || SUMMER VACATION ||

Sat May 19 , 2018
आठवणींचा तो क्षण पुन्हा तिथेच येऊन बसला मला कित्येक गोष्टी बोलून मनास त्याची ओढ लावून गेला