झाल्या कित्येक भावना रित्या
 सुटले कित्येक प्रश्न आता!!
 कोण ओळखीचे इथे भेटले
 अनोळखी झाल्या वाटा!!

 साथ कोणती हवी या क्षणा
 मी असूनी का आहे एकटा!!
 नसावी त्या सावल्यांची आस
 कोणत्या या मनाच्या छटा!!

 शोध संपला सुटल्या दिशा
 मुक्त वाहतो तो आज वारा!!
 ओढ नाही मनास आता कोणती
 कसल्या बंधनाचा आता मारा!!

 का असे भेटलो मी कोणा
 विसरून सारे गुंग त्या जगा!!
 पुन्हा भेटण्यास यावे का कोणा
 की विसरून जावे माझे मला!!

 मनात पाहुनी ओळखीचा चेहरा
 मी भेटलो आज माझेच मला!!
 ओळखले मी माझेच मला नी
 हरवून गेलो मी साऱ्या जगा!!

 झाल्या कित्येक भावना रित्या
 सुटले कित्येक प्रश्न आता ..!!

 ✍योगेश

*ALL RIGHTS RESERVED*
Share This:
आणखी वाचा:  कवितेतुन ती || KAVITETUN TI || LOVE ||