"नकळत साऱ्या भावनांचे
 ओझे आज का झाले
 काही चेहरे ओळखीचे त्यात
 काही अनोळखी का निघाले!!

बोलल्या भावना मनाशी तेव्हा
 सारे गुपित उघडे का झाले
 क्षणभर सोबती हसवून जाता
 आपलेच का रडवून गेले!!

शोधले खूप उगाच स्वतःस
 अखेर ते शून्य का झाले
 साथ आयुष्भर देणारे त्यास
 मधेच का सोडून गेले!!

क्षणभर हसून पाहिले असता
 मन थोडे शांत का झाले
 अचानक अनोळखी कोणी मग
 आठवणी देऊन का गेले!!

हा भार पेलवत उगाच मग
 मन बोलते का झाले
 भावनांशी खेळ कसला 
 स्वतःस रडवून का गेले!!

उरल्या थोड्या क्षणात आता
 मोकळे ते का झाले
 सारा भार मनास देऊन
 हलके ते का झाले!!

नकळत साऱ्या भावनांचे
 ओझे आज का झाले!!!!"
✍️©योगेश खजानदार
Share This:
आणखी वाचा:  पैसा बोले || पैसा चाले || PAISA MARATHI KAVITA ||