ओंजळ ..!! || ONJAL KAVITA ||

"ओंजळीत घट्ट धरून ठेवताच
 फुलं चुरगळुन जेव्हा जातं!!
 मनातल्या आठवणींना तेव्हा
 सुगंध देऊन जातं!!

 पुन्हा पुन्हा ओंजळ ती उघडून
 सुगंध घ्यावस का वाटत रहातं!!
 मनातल्या सुगंधात तेव्हा का
 आपलंसं कोण भेटतं रहातं!!

 का त्रास त्या फुलांस ओंजळीचा
 सुगंधाची चुक ना कोण पहातं!!
 आठवणींच ओज तेव्हा का
 सतत मनास बोल लावतं रहातं!!

 चुरगाळून गेले ते फुल कितीही
 ओंजळीस तरी सुगंध देत रहातं!!
 आठवणींच्या वेदना किती तरीही
 मनास का ते सुखावून जातं!!

 झाली ओंजळ रिकामी तरी
 सुगंध अखेर तसाच राहतो!!
 कितीही विसरु पाहता आठवणी
 मनात सुगंध नेहमीच दरवळत रहातो!!

 ओंजळीत घट्ट धरून ठेवताच
 फुलं चुरगळून जेव्हा जातं ..!!!"
 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

असे कसे हे || Love POEM ||

वाट ती तुझ्या येण्याची!! आता पाहवत नाही !! क्षणात यावे तुझ्या जवळ!! पण ते शक्य होत नाही !! सांग काय…
Read More

Next Post

बार्शी तुझा रस्त्यावर भरोसा हाय काय!!! Barshi Poems

Sat Sep 9 , 2017
बार्शी तुझा रस्त्यावर भरोसा हाय काय!!हाय काय!! कित्येक जीवाची पर्वा इथे नाही!! नाही!! खड्ड्यात रस्ता दिसत नाही!! नाही!! तरीही कोणी ऐकत नाही! नाही!! बार्शीचा रस्ता लई भारी!! भारी!!