"ओंजळीत घट्ट धरून ठेवताच
 फुलं चुरगळुन जेव्हा जातं!!
 मनातल्या आठवणींना तेव्हा
 सुगंध देऊन जातं!!

 पुन्हा पुन्हा ओंजळ ती उघडून
 सुगंध घ्यावस का वाटत रहातं!!
 मनातल्या सुगंधात तेव्हा का
 आपलंसं कोण भेटतं रहातं!!

 का त्रास त्या फुलांस ओंजळीचा
 सुगंधाची चुक ना कोण पहातं!!
 आठवणींच ओज तेव्हा का
 सतत मनास बोल लावतं रहातं!!

 चुरगाळून गेले ते फुल कितीही
 ओंजळीस तरी सुगंध देत रहातं!!
 आठवणींच्या वेदना किती तरीही
 मनास का ते सुखावून जातं!!

 झाली ओंजळ रिकामी तरी
 सुगंध अखेर तसाच राहतो!!
 कितीही विसरु पाहता आठवणी
 मनात सुगंध नेहमीच दरवळत रहातो!!

 ओंजळीत घट्ट धरून ठेवताच
 फुलं चुरगळून जेव्हा जातं ..!!!"
 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*
Share This:
आणखी वाचा:  सावली || SAWALI MARATHI POEM ||