ऐक ना !! थोड सांगायचं होत तुला !! रोजच्या आठवणींत!! गिरवायच होत तुला !! हळूच अलगद गुलाबी थंडीत, बोलायचं होतं तुला !! तुझ्या नकारातही अलगद तेव्हा, हसू बघायचं होतं मला !! ऐक ना !! नव्याने भेटायचं होत तुला !! पुन्हा त्या वाटेवर, हरवून जायचं होत तुला !! कधी नकळत तेव्हा , माझ्यात शोधायचं होत तुला !! वळवणावरती वळताना, अश्रू लपवायचे होते मला !! ऐक ना !! पुन्हा भांडायच होत तुला !! कळत नकळत रुसल्यावर, मनवायच होत तुला !! गालावरच्या रंगास तेव्हा , आरशात दाखवायचं होत तुला !! सारं काही विसरून तेंव्हा , मिठीत घ्यायच होत मला !! ऐक ना !! पुन्हा नव्याने पहायचं होतं तुला !! नकळत त्या नजरेत, कैद करायच होत तुला ! पापण्यात त्या , जपायच होत तुला !! चोरुन त्या नजरेस, बोलायचं होत मला !! ऐक ना !! पुन्हा वचन द्यायचं होत तुला !! प्रत्येक श्वास तेंव्हा, बोलत असेल जेव्हा तुला !! आयुष्याचे क्षण जेवढे, सारे देऊन टाकायचे होते तुला !! आणि मिठीत येताना तू, अशीच सोबत हवी होती मला !!! ऐक ना !! थोड सांगायचं होत तुला !!! पुन्हा रोजच्याच आठवणींत, गिरवायच होत तुला !! -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
