एक online प्रेम || ONLINE LOVE POEM || MARATHI ||

Share This:
“सकाळी उठल्या बरोबर,
पहिला message तुलाच करायचे!!
तुझीच पहिली आठवण यावी,
हे शब्दात मांडायचे!!

Good morning ते Good night,
खूप काही बोलायचे!!
या मधे कसे आणि कधी,
सारे दिवस छान जायचे!!

काही घडलच नवीन तर,
पहिलं तुला सांगायचे!!
Sad आणि happy मध्ये,
किती भाव बदलायचे!!

नव्हतं रे करमत मला,
तुला खूप बोलू वाटायचे!!
तुझ्या सवे सतत,
गप्पा मारू वाटायचे!!

जमलच कधी तर,
भेटायला ही यायचे!!
पण chat वर बोलते इतकं,
बिंधास्त बोलण नाही व्हायचे!!

कधी वेळ गेली,
मलाच न कळायचे!!
रात्रीचे 12 वाजले तरी,
तुलाच बोलू वाटायचे!!

पण हे प्रेम होते की फक्त मैत्री,
मलाच न कधी कळायचे!!
पण तुझ्या सवे सतत,
खूप बोलू वाटायचे!!

आज पुन्हा मेसेजेस पाहताना,
तुला खुप miss करायचे!!
तुटलेल्या नात्यात,
तुला उगाच शोधत राहायचे!!

कधी कळलेच नाही
,
तुझ्यात हरवून जायचे!!
तुझ्या निघून जाण्याची भीती,
मनात लपवून असायचे!!

हे नात होते की एक आभास,
मनास मी पुसायचे!!
संपले आहे नाते तरी,
मनास कसे सांगायचे!!

सांग आता तू मला,
हे नाते मी कसे जपायचे!!
त्या ब्लॉक लिस्ट मधे आहे,
पण मनातून कसे विसरायचे ??

तूच सांग ना ???”

✍योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*