“लोकमान्य टिळकांनी एका गोष्टीचा नेहमीच आग्रह धरला ,तो म्हणजे संपूर्ण स्वतंत्र भारत.
स्वतच्या शाळेत ” Dogs & British are not allowed !!” म्हणत ब्रिटिशांच्या विरूद्ध स्वांतंत्र्याच युद्ध करणारे ते लोकमान्य.
“अरे कोण कुठला हा England देश ज्यावर सारा हिंदुस्तान धुंकला तरी त्यात तो वाहून जाईन!! “
“आमच्या धर्मात सुधारणा आम्ही करूच पण ती भारत स्वतंत्र झाल्यावर. ह्या परकीय ब्रिटिशांचा काय संबंध आमच्या धर्मात ढवळाढवळ करण्याचा.” अस म्हणत मंडालेच्या तुरुंगात कित्येक वर्ष टिळकांना तुरुगवसात ठेवलं गेलं.
“गांधी स्वतंत्रता के इस संग्राम मे खून बाहानही होगा , वरणा मिले हुये स्वतंत्रता की कोई किंमत नही रहेगी!!”
असे लोकमान्य ज्यांनी कित्येक वर्ष ब्रिटिश सत्ते विरुद्ध संघर्ष केला!! पण आज होतंय काय !! जातीपातीच्या राजकारणात समाज हरवून जातोय. आज जर लोकमान्य असते तर आमच्यात मुस्काटात दोन ठेवून दिल्या असत्या .. ज्या ब्रिटिशांना त्यांनी त्याच्या शाळेत यायला बंदी केली त्यांचीच भाषा आम्ही आज शिक्षणात वापरतोय कारण कदाचित आज आम्हाला आमच्या भाषेची लाज वाटतेय .. हरलात टिळक तुम्ही तिथेच ..
जगविख्यात शास्त्रज्ञ मेरी क्युरी बद्दल माझ्या वाचनात एक गोष्ट आली होती ती म्हणजे ती तिच्या भाषेची असलेली निष्ठा. मेरी क्युरी च्या वडिलांचं मत होते की मुलांना जर त्याच्या भाषेत शिकायला मिळत असेन तर ते जास्त चिकाटीने शिकतात. आणि पोलंड देश पारतंत्र्यात असतानाही त्यांनी त्याची जिद्द सोडली नाही. मग आज भारतातच हा हट्टाहास का ??
घरी मराठीत बोलायच मग शाळेत इंग्लिश. आता भारताचा इतिहास इंग्रजीत कसा शिकायचा?? ज्या भाषेच्या लोकांनीच आमच्यावर आन्याय केला त्यांचीच भाषा वापरत आम्ही शिकायचं का ?? का तर आम्हाला मराठी हिंदी गुजराती कन्नड आशा भाषेची लाज वाटतेय म्हणूनच कदाचित. मी म्हणेन तुम्ही विज्ञान मराठीतूनच शिकावं. २ नोबेल पुरस्कार घेणाऱ्या मेरी क्युरीला भाषेमुळे कधीच अडथळा आला नाही. मग इंग्रजी ही जगाची भाषा आहे अस म्हणत आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालणाऱ्या पालकांची खरंच कीव येते. मला लोकमान्यांचे अजून एक वाक्य आठवते, आपल्याला उद्याचा तरुण घडवायचा आहे या ब्रिटिशांना तिकडून इकडे कारकून आणणे परवडत नाहीत म्हणून ते इथे शाळा कॉलेजेस चालवतात. मग मला सांगा मित्रानो उद्याचा भारत घडवायचा असेल तर मग आम्हाला आमच्या भाषेतच शिकायला हवं.
शिवरायांनी कधीच या इंग्रजांना आपलंसं केलं नाही. मग आज आम्ही शिवरायांचा इतिहास त्याच्या भाषेत का शिकावा?? आणि मग या देशाबद्दल आजच्या तरुण पिढीला कोणते प्रेम आणि आपुलकी राहणार आहे?? उच्च शिक्षण कशाला घ्यायचं तर परदेशात जाऊन पैसा कमवयसाठी. खरंच हे दुःख आहे.
लोकमान्य टिळकांचा जन्म कधी झाला?? हा फक्त आता शाळेत २ गुणांचा प्रश्न राहिलाय आता. बाकी काही नाही !!!
✍योगेश खजानदार