"शोधुनही सापडेना, एक वाट ती!! हरवली सांज ,हरवली रात्र ती!! नभी एक चांदणी, पाहते कुणा ती!! मझ सांगते पहा, सोबतीस एक ती!! समीप अंधार हा, दुर चांदणी ती!! तरी सोबतीस का सवे?? चालते ती!! मी हसताच का?? हसते ती!! मी थांबताच का?? थांबते ती!! एक चांदणी नभातील, मनात ती!! चुकलेल्या वाटेवर, गोड स्वप्न ती!! सोबती येण्या सवे, करते हट्ट ती!! मी चालता पुढे, मागे येतेच ती!! काही न मागता, हवी साथ ती!! अंधारल्या रात्रीतील, मैत्रीण ती!! शोधुनही सापडेना, एक वाट ती..!!" ✍️योगेश खजानदार
