"न मी उरले माझ्यात आता
 तुझ्यात जरा शोधशील का ..??
 भाव या मनीचे माझ्या तू
 नकळत आज ओळखशील का .??

 तुझ्याच वेड्या स्वप्नात रमले
 तिथे मला तू भेटशील का ..??
 अलगद या हृदयात तुझ्या तू
 मला सामावून घेशील का ..??

 पाऊलवाट ओळखीची एक
 सोबत माझी होशील का ..?
 कधी मावळती होताना मग
 मला जवळ करशील का..??

 हळूवार स्पर्श होताच तुझा
 माझे लाजणे पाहशील का ..??
 माझ्या डोळ्यात तुझ्या प्रेमाची
 ओढ तुला कळेल का ..??

 चांदणे पांघरूण येताना मग
 रात्र तुझ ती बोलेल का ..??
 माझ्या मनाच्या कोपऱ्यात तुला
 तुझेच चित्र दिसेल का ..??

 प्रत्येक श्वास बोलला काही
 तू काही ऐकले का .??
 हवी एक तुझीच साथ मला
 एवढे वचन देशील का ..??"

 ✍️©योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*
SHARE