तिच्या मनात खुप काही आहे, पण त्याच्या सहवासात तिला काही सुचतच नाही. क्षणात खूप जगतेय ती त्याच्यासवे आणि मग अलगद आयुष्यभराची साथ मागते आहे ..!! नकळत तेव्हा क्षणही थांबले आहेत ..!! .. मनातल्या तिच्या भावना जणू म्हणतात ..!!
"बरंच काही बोलायचे होते तुला पण सारे मनातच राहून गेले!! तुझ्या हसऱ्या चेहऱ्यावर तेव्हा सगळे काही विरून गेले!! तु सोबत होतास माझ्या एवढंच मन सांगून गेले!! तुझ्या सहवासात तेव्हा जणू कित्येक दुःख हरवून गेले!! राहिले काही कळलेच नाही सारे काही घडून गेले!! एका क्षणात तेव्हा जणू सारे आयुष्य जगून गेले!! ती सांज आणि ती लाट खुप काही सांगुन गेले!! तुझ्या आणि माझ्या सोबतीची तेव्हा ती वेळ थांबून गेले!! नकळत का उगाच मग मी एक वचन मागून गेले!! माझ्या आयुष्याची वाट एकटी तुझा सहवास मागून गेले!! बरंच काही बोलायचे होते तुला पण सारे मनातच राहून गेले ..!!" ✍️© योगेश खजानदार